Homeपब्लिक फिगरमनपा कार्यालयाबाबत रविंद्र...

मनपा कार्यालयाबाबत रविंद्र वायकरांच्या प्रयत्नांना यश येणार!

मुंबईतल्या जोगेश्‍वरीतील जनतेच्या मागणीनुसार जोगेश्‍वरी (पूर्व) पूनम नगर येथील मजास मंडईत मुंबई महानगरपालिकेचे के उत्तर हे नविन कार्यालय सुरू करण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांच्या प्रस्तावाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत मंजुरी दिली.

ट्रॉमा हॉस्पिटल येथे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रासाठीचे स्वतंत्र मनपा कार्यालय बांधून होईपर्यंत मजास मंडईत विभागीय कार्यालय सुरू करण्याबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त निर्णय घेतील, असे आश्‍वासन त्यांनी दिले. यामुळे जोगेश्‍वरीकरांसाठी स्वतंत्र मनपा कार्यालय सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनपा आयुक्त व संबंधित खात्याचे व इतर अधिकारी उपस्थित होते.

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात एकूण ८ प्रभाग येत असून यातील ६ प्रभाग (७२, ७३, ७४, ७७, ७८ व ७९) के (पूर्व) व २ प्रभाग (५२ व ५३) पी (दक्षिण) कार्यालयास जोडण्यात आले आहे. ही दोन्ही मनपाची कार्यालये सुमारे ८ ते ९ कि.मी. अंतरावर आहेत. मागील काही वर्षांमध्ये जोगेश्‍वरीचा सर्वांगीण विकास होत असल्याने येथील लोकसंख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे विविध कामांसाठी मनपाच्या या दोन्ही कार्यालयांत जाण्या-येण्यासाठी येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र विभागीय मनपा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने करण्यात येत होती व वायकर यांनी या मागणीसाठी पाठपुरावा केला

सुरुवातीला जोगेश्‍वरी मौजे मजास न.भू.क्र. ५० व ५१ या भूभागावर मनपा कार्यालय उभारण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु तांत्रिक व धोरणात्मक बाबींमुळे हा प्रस्ताव मंजूर होण्यास विलंब होत असल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मजास मंडई या इमारतीत जोगेश्‍वरीकरांसाठी स्वतंत्र मनपा कार्यालय सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्तावही पाठविला आहे. सद्यस्थितीत पूनम नगर येथील मनपाच्या मजास मंडई या १० मजली इमारतीतील काही मजले मनपाच्या इमारत प्रस्ताव विभागास वापर करण्यास देण्यात आले आहेत. या इमारतीत वाहन पार्किंगची सुविधा असून इमारत जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना विविध कामांसाठी ये-जा करण्यासाठी सोयीस्कर आहे. या प्रश्‍नी २०१२पासून मुंबई महापालिका प्रशासन व राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून कपातसूचना, प्रश्‍न अशा विविध आयुधांच्या माध्यमातून ही बाब उपस्थित करण्यात आली आहे. १० मजली मजास मंडईच्या इमारतीतील ३ मजले मंडईकरीता राखून ठेवून उर्वरित रिक्त मजले के (पूर्व) व पी (दक्षिण) कार्यालयांतर्गत येणार्‍या जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील ८ प्रभागांसाठी जोगेश्‍वरीकरांसाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यास उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी रविंद्र वायकर यांनी काल लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली.

यावर उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी, या मंडईतील ज्या गाळ्यांबाबत मनपाने करार केला आहे, त्या करारामुळे काही अडचण निर्माण होणार नाही याचा विचार करावा. सध्या मनपाचे प्रशासक म्हणून आयुक्त काम करीत असल्याने त्यांनी नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content