Homeन्यूज अँड व्ह्यूजरश्मी बर्वे यांचा...

रश्मी बर्वे यांचा जाणूनबुजून गेम केला गेला!

काँग्रेसमध्ये महिलांना नेहमीच दुययम दर्जाची वागणूक मिळत असून रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा जाणूनबुजून गेम केला गेला असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी काल केला.

विदर्भ दौऱ्यावर आलेल्या पूर्व विदर्भ महिला संपर्क नेत्या व शिवसेना सचिव आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी काँग्रेसवर खरमरीत टीका केली. रश्मी बर्वे यांच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत जातपडताळणी समितीकडे सुनावणी सुरु होते तसेच उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. असे असूनही काँग्रेसच्या नेते मंडळींनी जाणूनबुजून बर्वे यांना तिकीट दिले. रामटेक हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. परंतु रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. जातपडताळणी प्रमाणपत्रावरून आपल्या अडचणी वाढू शकतात हे ओळखूनच रश्मी बर्वे यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल करताना त्यांना दिल्या जाणाऱ्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे पती श्याम कुमार बर्वे यांचे नाव टाकण्यात आले होते, असे त्या म्हणाल्या.

काँग्रेस नारीशक्तीचा पुकारा देऊन मतपेटीचे राजकारण करते. त्यांना रश्मी बर्वे यांच्या जागेवर दुसरी महिला उमेदवार मिळू शकत नाही हेच दुर्दैव आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जातपडताळणी समितीने हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांचे खच्चीकरण करण्याचे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असेल, असेही त्या म्हणाल्या.

प्रतिभा धानोरकर करतात फक्त आणि फक्त अश्रूंचे राजकारण

चंद्रपूरमध्ये महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारातही डॉ. मनीषा  कायंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यापासून चंद्रपूर येथील लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर फक्त आणि फक्त अश्रूंचे व सहानुभूतीचे राजकारण करीत असल्याची टीका त्यांनी केली. माझे अश्रू पहा आणि मतदान करा, हे राजकारण विकासाच्या झंझावातासमोर फिके पडणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

आम्ही कधीच कोणाच्याही अश्रूंचा अनादर केला नाही. पण अश्रूंचा वापर मतदान मिळविण्यासाठी कोण करीत असेल तर मात्र महायुती गप्प बसणार नाही. ही निवडणूक देशाला दिशा देणारी असून मोदी सरकारने केलेल्या दहा वर्षांच्या कामाच्या भांडवलावर आम्ही जनतेकडे मत मागत आहोत. परंतु काही उमेदवार भावनिक राजकारणाला पाठीशी घालत आहेत. जनतेला अश्रूंचे राजकारण व विकासाचे राजकरण यातील फरक चांगलाच कळत असून या निवडणुकीत चंद्रपूर येथील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असेही कायंदे म्हणाल्या.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content