Homeकल्चर +‘रानसावल्या’चे शनिवारी प्रकाशन

‘रानसावल्या’चे शनिवारी प्रकाशन

निसर्गप्रेमी आणि अभ्यासक श्रीरंग फडके यांनी लिहिलेल्या ‘रानसावल्या’, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी, १४ फेब्रुवारीला गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालयातील डॉ. भानुबेन नानावटी कलाघर येथे होत आहे. संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (वन्यजीव) डॉ. विनया जंगले प्रमुख अतिथी तसेच ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

लेखक श्रीरंग फडके यांचे ‘रानसावल्या’ हे पुस्तक गोव्याच्या ब्रॉडवे प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकास गोव्यातील ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकात १४ कथा/लेख/निबंध असून लेखकाच्या अनुभवावरून त्या नोंदल्या आहेत. त्यातले काही लेखकाचे स्वतःचे अनुभव असून काही ऐकलेल्या गोष्टी आहेत. काही कथा काल्पनिक असून सत्याच्या जवळ जाणाऱ्या आहेत. काही व्यक्तिचित्रे आहेत. थोडक्यात म्हणायचं झाल्यास हे निसर्गसाहित्य आहे. मराठी भाषेतल्या निसर्ग साहित्यात आजवर अनेक मातब्बर लोकांनी आपापले अनुभव, लेख, कथा लिहिल्या आहेत. त्यांचा वारसा लिखित स्वरूपात पुढे चालू ठेवण्यासाठी छोटं योगदान असावं म्हणून हे निसर्ग अनुभवांचं लिखाण वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

या पुस्तकाचं मूल्य रुपये ४००/- असून प्रकाशनाच्या दिवशी प्रकाशनस्थळी वाचकांसाठी ते रुपये ३५०/- ला दिले जाईल. अधिक माहितीसाठी किंवा पुस्तकासाठी लेखक श्रीरंग फडके यांच्याशी ९९२०३९०१०९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा shreerang.kanha@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.

Continue reading

राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे दमानियांचे षडयंत्र!

कृषी साहित्यखरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट असे नाना प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले, यामध्ये कृषीखरेदीबाबत सुरुवातीला उच्च न्यायालयात ज्यांनी तक्रार केली होती, त्यांनी खोटे पुरावे दिले आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शासनाची बदनामी केली म्हणून उच्च न्यायालयाने एक लाखांचा दंड ठोठावला. त्यांनी...

आखाती संघर्षातून अमेरिकेकडून पॅकअपच्या हालचाली?

आखातात इराणने अमेरिका तसेच इस्त्रायला पूर्णपणे जेरीस आणल्यामुळे हताश झालेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता युद्धातून पॅकअप करण्यास सुरूवात केली असल्याचे चित्र दिसत आहे. आम्ही आमच्या उद्दीष्टांपर्यंत पोहोचलो आहोत. इराणची अण्वस्त्रनिर्मिती ठिकाणे आम्ही उद्ध्वस्त केली आहेत. इराणचे नोदल,...

अवघ्या ३ महिन्यांतच नितीश कुमार यांचा बिहारला बायबाय?

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेणारे नितीश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. येत्या १६ मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते राज्यसभेवर जाण्याची शक्यता असून त्यांचे पुत्र निशांत कुमार बिहार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होतील...
Skip to content