Homeमुंबई स्पेशलभायखळ्यातली ‘राणीची बाग’...

भायखळ्यातली ‘राणीची बाग’ राहणार बुधवारी खुली

मुंबईच्या भायखळ्यातले वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच पूर्वीची राणीची बाग येत्या बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी राहणार असून त्याऐवजी ती गुरुवारी, १७ ऑगस्टला बंद राहणार आहे, असे मुंबई महापालिकी प्रशासनाने कळवले आहे.

येत्या बुधवारी, १६ ऑगस्टला पतेतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. मात्र, बुधवार, १६ ऑगस्ट रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १७ ऑगस्ट २०२३ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद असेल.

भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले असते व दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते. यानुसार बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content