Homeपब्लिक फिगररामदास आठवले यांनी...

रामदास आठवले यांनी घेतली अजितदादांची भेट!

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज  महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे रिपब्लिकन पक्षातर्फे अभिनंदन केले.

अजित पवार भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइं महायुतीसोबत आल्यामुळे आमच्या महायुतीची ताकद अधिक वाढली आहे. राज्य सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळावा यासाठी आपण आज अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती रामदास आठवले यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली. अजित पवार आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कोणताही वाद नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content