Homeटॉप स्टोरीरेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस...

रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचे वेतन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत, आर्थिक वर्ष 2022-23 साठी सर्व पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाच्या समतुल्य पीएलबी म्हणजेच उत्पादनाशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी दिली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने 11,07,346 रेल्वे कर्मचाऱ्यांना 1968.87 कोटी रुपयांचा उत्पादनाशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी दिली आहे.

यामध्ये ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन व्यवस्थापक (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, पॉइंट्समन, मंत्रालयातील कर्मचारी वर्ग आणि इतर गट ‘क’ कर्मचारी (आर पी एफ /आर पी एस एफ कर्मचारी वगळून) यांचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रेल्वेची कामगिरी अत्यंत उत्तम राहिली. रेल्वेने 1509 दशलक्ष टन इतकी विक्रमी मालवाहतूक आणि जवळपास 6.5 अब्ज प्रवाशांची वाहतूक केली.

या विक्रमी कामगिरीसाठी अनेक घटकांचे योगदान लाभले आहे. यामध्ये केंद्र सरकारने रेल्वेतील पायाभूत सेवांमध्ये भांडवली खर्चासाठी केलेली विक्रमी गुंतवणूक, कार्यक्षमतेतील सुधारणा आणि उत्तम तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे. उत्पादनाशी निगडीत बोनसमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीत अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content