Homeटॉप स्टोरीपुण्यातले श्री क्षेत्र...

पुण्यातले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद!

पुण्यातले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाचे बांधकाम तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाची कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठिी येत्या ९ जानेवारी २०२६पासून पुढील तीन महिन्यांसाठी (महाशिवरात्रीचा कालावधी वगळून) मंदिर भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानने घेतला आहे. यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी केले आहे. 

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासनाने विशेष विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी तसेच प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातली सुरक्षितता लक्षात घेता २३ डिसेंबरला पुणे जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार व श्री भीमाशंकर येथील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या एका संयुक्त बैठकीत सर्वांच्या सहमतीने मंदिर ९ जानेवारीपासून पुढे तीन महिन्यासाठी (महाशिवरात्रीचा १२ ते  १८ फेब्रुवारी २०२६ हा कालावधी वगळून) तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, भाविकांच्या सोयीसाठी महाशिवरात्रीच्या काळात मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

२०२७मध्ये नाशिकला त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. त्यापूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ २०२५च्या अनुभवावरून कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणारे लाखो भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक त्या पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. कामाचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासोबतच कामे नियोजित कालमर्यादेत पूर्ण करण्याकरीता मंदिर परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद करण्यात येणार आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकर यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार व नियोजित वेळेत सुरू राहतील. थेट दर्शन बंद असताना भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश अथवा प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध राहणार नाही. बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता कोणालाही श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतलेला असून भाविकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डूड्डी यांनी केले आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content