Homeन्यूज ॲट अ ग्लांसतत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात...

तत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात 7 तारखेला विशेष मोहीम

पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

तत्काळ योजनेसाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असून, पात्रता मार्गदर्शक तत्त्वे कठोर आहेत. अनेक अर्जदार यापैकी एक अथवा दोन्ही निकष पूर्ण करू शकत नाहीत, यशस्वीपणे अर्ज सादर करू शकत नाहीत. त्यामुळे अर्जदारांनी याबाबतची नियमावली आणि सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि अपॉइंटमेंच्या दिवशी आपल्याकडे पुरेशी आणि पात्रतेचे निकष पूर्ण करणारी वैध कागदपत्रे आहेत का, याची खात्री करावी. तत्काळसाठी अपात्र ठरण्याचे निकष जाणून घेण्यासाठी या लिंकवर जावे: https://www.passportindia.gov.in/psp/TatkaalPassports (अर्जदाराची सत्यता तपासण्यासाठी पासपोर्ट कायद्यानुसार पासपोर्ट प्राधिकरण अशी सर्व चौकशी करू शकते आणि अर्जावर पुढची कार्यवाही करण्यासाठी आवश्यक वाटणारी अतिरिक्त माहिती, कागदपत्रे सादर करायला सांगू शकते.)

तत्काळ विशेष मोहिमेत अपॉइंटमेंटसाठी अशी करा नोंदणी:

  1. पासपोर्ट इंडिया वेबसाइट (https://www.passportindia.gov.in) किंवा mPassport सेवा एपला भेट द्या आणि TATKAAL योजनेअंतर्गत अर्ज दाखल करा.
  2. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर, ‘शेड्यूल अपॉइंटमेंट पेज’वर जा, ‘PSK पुणे’ हे स्थान निवडा आणि विशिष्ट तारखेसाठी अपॉइंटमेंट बुक करा.

टीप: ही मोहीम फक्त तत्काळ अपॉइंटमेंटसाठी आहे. सामान्य श्रेणीतील व्यक्तींचे अर्ज किंवा आयत्यावेळी येणाऱ्या व्यक्तींना यात परवानगी दिली जाणार नाही.

विशेष मोहिमेचा तपशील:

  1. तारीख: 7 फेब्रुवारी 2026 (शनिवार)
  2. स्थळ: झिरो वन, क्र.79/1, घोरपडी, मुंढवा रोड, पिंगळे वस्तीसमोर, गंगा ऑर्किड, मुंढवा, पुणे– 411036.
  3. श्रेणी: केवळ तत्काळ नियुक्त्या (नवीन आणि पुनर्निर्देशित)
  4. वेळ: सकाळी 09:00 ते संध्याकाळी 05:00 (अर्जदारांनी त्यांच्या नियोजित अपॉइंटमेंटच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी कार्यालयात पोहोचावे)

Continue reading

‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या गाण्यांचे लोकार्पण

मुंबईतल्या बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने नुकतेच ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले', या दोन मराठी गाण्यांचे लोकार्पण सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजिवासनसारख्या...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किंमत शून्य…

भीमाशंकर-कर्जत येथील टोरंट पॉवरच्या 3000 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कर्जत पोलीस ग्राउंडवरील सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात काय करायचे, काय नाही, हे सगळे दिल्लीतून ठरते,...

इस्रायलमधले नेतन्याहू सरकार डामाडोल

इस्रायलच्या निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू किंवा त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी गाडी आयझेनकोट या दोघांनाही स्पष्ट बहुमताचा मार्ग नाही. सुरुवातीच्या 50% मतमोजणीनंतर नेतन्याहू यांच्या गटाला 53-55 जागा आणि आयझेनकोट यांच्या विरोधी गटाला 48-49 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर अरब पक्षांना 16...
Skip to content