Homeपब्लिक फिगरपंतप्रधान नरेंद्र मोदीः...

पंतप्रधान नरेंद्र मोदीः परचा आणि मास्क!

एरव्ही मुख्यमंत्र्यांसोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी परचा आणि मास्क वापरतात. मात्र, ज्यादिवशी ते भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले त्याचदिवशी त्यांचा परचा आणि मास्क दोन्ही गायब होते. याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केला.

याच कार्यक्रमात मोदींनी मास्क का घातला नाही व परचा का घेतला नाही? ते खरेच भावूक झाले की ठरवून झाले, असा सवाल जनता करत आहे असेही ते म्हणाले. देशात लाखोंच्या संख्येने लोकांनी आपला जीव गमावला. औषधोपचार मिळत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले. केंद्र सरकार व बहुतांश राज्य सरकारांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले, असे चित्र निर्माण करण्यात आले असा आरोपही त्यांनी केला. यात खरं काय आहे हे मोदीच सांगू शकतील, असा टोलाही मलिक यांनी लगावला.

नरेंद्र मोदी

मोदी सरकारची सात वर्षे आणि सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

गेल्या सात वर्षांत नोटाबंदी झाली.. जीएसटी लावण्यात आली.. कोरोनासारखी महामारी हाताळता आली नाही.. लोकांचे हाल झाले.. बेरोजगारी वाढली.. नोकर्‍या गेल्या.. लोकं जीव गमावत आहेत.. तरीही भारतीय जनता पार्टी सरकारची ७ वर्षं साजरी करणार होती. मात्र, जनतेतला रोष ओळखून भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उत्सव साजरा न करण्याचा आदेश काढावा लागला, असा दावाही त्यांनी केला.

२६ मे रोजी केंद्रातील भाजप सरकारला ७ वर्ष पूर्ण होत आहेत. या देशात भाजपचे सरकार आहे. मात्र ते मोदी सरकार म्हणून ओळखले जाते. या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपचे लोक उत्सव साजरा करणार होते. मात्र ऐनवेळी नड्डा यांनी उत्सव साजरा करू नये, असा आदेश काढल्याचे नवाब मलिक म्हणाले.

‘असे’ इंडियन मॉडेल कोणच स्वीकारणार नाही

नदीमध्ये मृतदेह प्रवाहित करणे.. ऑक्सिजनअभावी लोकं मरत आहेत.. औषधांचा तुटवडा आहे.. देशात लस उपलब्ध नसताना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर करणे.. हे इंडियन मॉडेल कोणच स्वीकारणार नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या इंडियन मॉडेलचा समाचार घेतला. इंडियन मॉडेल झालेच पाहिजे. परंतु हेच इंडियन मॉडेल असेल तर लोकांना यावर बोट ठेवण्याची संधी भाजपा निर्माण करुन देते, असेही ते म्हणाले.

चांगली कामे करत राहिले पाहिजे. एखादं यश असेल किंवा काम झालं असेल तर निश्चित रुपाने लोकं प्रशंसा करतात. पण अपयशी ठरुनही आम्ही चांगलं काम करतोय, असं भाजपा बोलत राहिली तर लोकं स्वीकारणार नाहीत, असा टोलाही मलिक यांनी लगावला.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content