Homeकल्चर +भाग घ्या हिंदुस्तानी...

भाग घ्या हिंदुस्तानी खयाल गायन स्पर्धेत

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘डिस्कवर, परफॉर्म, राइज इन खयाल’, या थीमखाली हिंदुस्तानी खयाल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १६ ते ३० वर्षे वयोगटातील कलाकारांसाठी असून, येत्या २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृह, यशवंत नाट्य मंदिराजवळ, माटुंगा, मुंबई ४०००१६ येथे होणार आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून युवा गायकांना खयाल गायकीच्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. पारंपरिक हिंदुस्तानी संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज, केंद्राच्या कार्यालयात किंवा वेबसाइटवर dadarmatungaculturalcentre.org उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९७००९८८८९४ वर संपर्क साधता येईल. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२६ आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content