Homeडेली पल्सबिबट्यांना पळवायचंय, गाणी...

बिबट्यांना पळवायचंय, गाणी लावा…

बिबट्या आला तर रोडिओवर गाणी लावा… म्हणजे बिबट्या पळून जातो, असा सल्ला वन अधिकारी देतात, अशी तक्रार एका आमदाराने काल विधानसभेत केली. त्यावरून संतप्त झालेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गाणं म्हणून बिबट्या पळून जात नाही, हे स्पष्टपणे सांगितले. पण, तसे सांगताना लक्षवेधी सूचना कोणीतरी मांडल्यावर वनअधिकाऱ्यांचा हा सल्ला वनमंत्र्यांना विधानसभेत ऐकवण्याची वाट बघू नका. हा सल्ला मिळाल्यामिळाल्या आपल्या लेटरहेडवर एक पत्र लिहून वनमंत्र्यांना म्हणजे मला पाठवा म्हणजे मी तसा सल्ला देणाऱ्या वनअधिकाऱ्यांना गाणी ऐकायला मिळतील, अशा ठिकाणी पाठवतो, असे मुनगंटीवार यांनी सांगताच सभागृहात हंशा उसळला.

तुम्ही आमदारांनी अशा गोष्टी वेळच्या वेळी सांगितल्या नाहीत तर मग राज्याच्या विकासाचेच गाणे झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टिप्पणीही वनमंत्र्यांनी केली.

गाणी

एका आमदाराने शेजारील राज्यातून हत्ती महाराष्ट्रात येतात आणि पिके नष्ट करतात, असे सांगितले. त्यावर छत्तीसगड किंवा कर्नाटकसारख्या शेजारील राज्यातून हत्तीही महाराष्ट्रात येतात, इतका विकास माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकारने २०१४ ते २०१९मध्ये केलेला आहे, अशी टिप्पणी मुनगंटीवार यांनी केली. अर्थात, गंमतीचा भाग सोडून त्यांनी या सर्व संकटांवर सरकार करीत असलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी मुनगंटीवार यांच्या या उत्तरांना आणि असे व्हायला उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस जबाबदार आहेत, असे विधान केले. त्यावर सभागृहातील सर्वांनाच प्रश्न पडला आणि फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना वनमंत्री तसेच सांस्कृतिक कार्यमंत्रीही केलेले असल्यामुळे त्यांना वनअधिकारी गाणी ऐकवण्याचा सल्ला देत आहेत, अशी टिप्पणी केली आणि सभागृह पुन्हा हास्यकल्लोळात बुडाले.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content