Homeहेल्थ इज वेल्थमुंबईच्या कूपर रुग्णालयात...

मुंबईच्या कूपर रुग्णालयात वेदनाशमन बाह्यरुग्ण विभाग सुरू

मुंबईत विलेपार्ले स्थित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात वेदनाशमन बाह्यरुग्ण विभाग (Pain Clinic OPD) काल, २ जानेवारी २०२३पासून सुरू करण्यात आला आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या निर्देशानुसार हा विभाग कार्यान्वित करण्यासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. त्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण करुन काल कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्या हस्ते हा विभाग सुरू करण्यात आला. बधिरीकरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिता शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग कार्यरत झाला असून डॉ. मेघना पटवर्धन व डॉ. हरप्रीत कौर मदन या वेदनाशमन तज्ज्ञ म्हणून या विभागात कामकाज पाहणार आहेत. हा विभाग बधिरीकरणशास्त्र विभागातर्फे दर सोमवारी व शुक्रवारी दुपारी २.०० ते ३.३० वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग येथे कार्यरत असेल.

कर्करोग, संधीवात, मणक्याचे आजार, मज्जातंतूचे आजार या आजारांच्या रुग्णांना अतिवेदनेमुळे अत्यंत शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच खासगी रुग्णालयात या आजारांवरील उपचारपद्धतीचा खर्च अंदाजे २० हजार ते ५० हजार रुपये इतका असू शकतो. कूपर रुग्णालयात सुरू झालेल्या या बाह्यरुग्ण विभागाचा फायदा गरीब रुग्णांना होणार आहे, कारण हे उपचार विनामूल्य किंवा अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार आहेत. शस्त्रक्रियेनंतर होणारी तीव्र वेदना व दीर्घकाळ असणारे वेदनेचे निवारण करणे इत्यादी बाबी या वेदनाशमन बाह्यरुग्ण विभागामुळे शक्य होणार आहेत. या उपचारपद्धतीमध्ये वेदनाशमक औषधांव्यतिरिक्त वेगवेगळ्या मज्जातंतूना बधिर करणाऱ्या मार्गाचा अवलंब करण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहिते यांनी दिली.

महापालिकेचे परळ येथील केईएम रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर रुग्‍णालय या रुग्णालयांप्रमाणे पश्चिम उपनगरात अशी सेवा देणारे कूपर रुग्णालय हे एकमेव आहे. सदर वेदनाशमन विभागातील डॉ. मेघना पटवर्धन या वेदनाशमन तज्ज्ञ म्हणून मुंबईतील नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये गेली १० वर्षे ही सेवा देत आहेत. त्यांच्या अनुभवाचा व कौशल्याचा फायदा येथील गरजू रुग्णांना व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील (PG / MD) विद्यार्थ्यांना होणार आहे.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content