Homeटॉप स्टोरीहिवाळी अधिवेशनात फक्त...

हिवाळी अधिवेशनात फक्त ५ दिवसांचेच कामकाज!

महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या २२ डिसेंबरपासून सुरू होत असून त्यामध्ये फक्त पाच दिवसांचे कामकाज होणार आहे.

दोन आठवड्यांचे हे अधिवेशन असल्याचे सांगण्यात येत असले तरी पहिल्या आठवड्यात फक्त तीन दिवस तर दुसऱ्या आठवड्यात फक्त दोन दिवस कामकाज होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे, पुरवण्या मागण्या सादर करणे, शासकीय कामकाज आणि शोकप्रस्ताव घेण्यात येणार आहे.

दुसऱ्या दिवशी, गुरूवारी शासकीय कामकाज तसेच विरोधी पक्षांचा प्रस्ताव चर्चेला येईल. शुक्रवारी पुरवण्या मागण्यांवर चर्चा व मतदान होईल. त्याचदिवशी शासकीय तसेच अशासकीय कामकाजही केले जाईल.

दुसऱ्या आठवड्यात सोमवारी, पुरवणी विनियोजन विधेयक मांडले जाईल. शासकीय कामकाजाबरोबर अंतीम आठवडा प्रस्तावही मांडला जाईल. मंगळवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शासकीय कामकाजाबरोबर सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव मांडला जाईल.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content