Homeकल्चर +युवा संगमच्या तिसऱ्या...

युवा संगमच्या तिसऱ्या टप्प्यातील सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू!

एक भारत श्रेष्ठ भारत (EBSB) अंतर्गत युवा संगमच्या तिसऱ्या टप्प्यातील सहभागासाठी नोंदणी करण्याच्या पोर्टलची नुकतीच सुरुवात झाली. युवा संगम हा भारत सरकारचा देशातील विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील युवकांमध्ये परस्परसंबंध मजबूत करण्यासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे.

युवा संगमच्या आगामी टप्प्यात सहभागी होण्यासाठी युवा संगम पोर्टलवर, प्रामुख्याने 18-30 वयोगटातील इच्छुक तरुण,विद्यार्थी, NSS/NYKS स्वयंसेवक, नोकरी करणारे/ स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती नोंदणी करू शकतात.

याविषयीची तपशीलवार माहिती पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे: https://ebsb.aicte-india.org/

31 ऑक्टोबर 2015 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिवस या उपक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रांतील लोकांमधील चिरंतन आणि रचनात्मक सांस्कृतिक संपर्काची संकल्पना मांडली होती. ही संकल्पना साकार करण्यासाठी, 31 ऑक्टोबर 2016 पासून EBSB पोर्टलची सुरुवात झाली होती. 

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content