Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबई सहनिबंधक गट-क...

मुंबई सहनिबंधक गट-क संवर्गातील पदांसाठी उद्यापासून ऑनलाईन प्रक्रिया

मुंबई विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) या कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सहकार अधिकारी श्रेणी-१, सहकार अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपीक या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा परिक्षेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज  उद्या, दि. ७ जुलै २०२३पासून करता येणार आहेत.

या भरती प्रक्रियेबाबतच्या सविस्तर तपशिलासह जाहिरात सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. ७ जुलै २०२३ पासून उपलब्ध करण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज  दि. ७ जुलै २०२३ (दुपारी १२.०० वा. पासून) ते २१ जुलै २०२३ रोजी (रात्री २३.५९ वा. पर्यंत) या कालावधीत करता येतील, असे मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक यांनी कळविले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content