Homeबॅक पेजआयएनएस शारदाला 'ऑन...

आयएनएस शारदाला ‘ऑन दी स्पॉट युनिट प्रशस्तिपत्र’!

सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ओलिस ठेवलेल्या इराणी मासेमारी जहाज ओमारीवरील सर्व 19 सदस्यांची (11 इराणी आणि 08 पाकिस्तानी) सुरक्षित सुटका करण्यात सहभागी असलेल्या आयएनएस शारदाला चाचेगिरीविरोधातल्या यशस्वी कारवाईबद्दल नौदलप्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी दक्षिणी नौदल कमांड, कोची येथील भेटीदरम्यान, ‘ऑन दी स्पॉट युनिट प्रशस्तिपत्र’ नुकतेच प्रदान केले.

समुद्री चाच्यांनी अपहरण केल्याचा संशय असलेल्या इराणी मासेमारी जहाज ओमारीचा तपास करण्याचे काम या जहाजाला देण्यात आले होते. नौदल आरपीएने पाळत ठेवत दिलेल्या माहितीच्या आधारे, या जहाजाचा मार्ग रोखत रात्रभर माग ठेवला. 2 फेब्रुवारी 24 रोजी पहाटेच्या वेळी, जहाजाला संकेत दिले गेले आणि त्यानंतर प्रहार पथक धाडले गेले. जहाजाच्या आक्रमक पवित्र्याने चाच्यांना जहाजावरच्या सर्वाना आणि बोटीला सुरक्षितपणे सोडण्यास भाग पाडले. जहाजाच्या जलद आणि निर्णायक कृतींमुळे अपहृत मासेमारी जहाज आणि त्याच्या सदस्यांची सोमाली चाच्यांपासून सुटका झाली. जहाजाच्या अथक परिश्रमाने, चाचेगिरीविरोधी कारवाईसाठीच्या मोहिमेमुळे मोलाचे जीव वाचले आणि हिंद महासागर क्षेत्रातील खलाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढविण्याच्या भारतीय नौदलाच्या संकल्पाला अधिक बळकटी मिळाली.

नौदल प्रमुखांनी शारदाच्या चमूशी संवाद साधला आणि चाच्यांच्या हल्ल्याला तत्परतेने प्रत्युत्तर दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. आपल्या भाषणादरम्यान आर हरी कुमार यांनी चालक दलाच्या व्यावसायिक दृष्टिकोनाची प्रशंसा केली ज्यामुळे भारतीय नौदलाला या प्रदेशातील पसंतीचे सुरक्षा भागीदार म्हणून मान्यता आणि प्रशंसा मिळाली.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content