Homeब्लॅक अँड व्हाईटस्वातंत्र्यदिनानिमित्त टपाल कार्यालयांतही...

स्वातंत्र्यदिनानिमित्त टपाल कार्यालयांतही होणार राष्ट्रध्वजाची विक्री!

देशवासियांच्या हृदयात राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्यासाठी आणि हा जोम आणि देशभक्तीची भावना यांचा अशाच प्रकारे अविष्कार करण्यासाठी, भारत सरकार यावर्षी देखील 13-15 ऑगस्ट 2023 या काळात हर घर तिरंगा अभियानाचे आयोजन करत आहे. या अभियानाला पाठबळ देण्यासाठी देशातील 1.6 लाख टपाल कार्यालयांच्या जाळ्याचा उपयोग करुन घेण्याचा आणि या अभियानाअंतर्गत देशातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध होतील याची खात्री करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टपाल कार्यालयांमध्ये लवकरच राष्ट्रध्वजांची विक्री सुरु होईल आणि नागरिकांना त्यांच्या जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन ध्वज खरेदी करता येतील. नागरिकांना टपाल खात्याच्या www.epostoffice.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावरील ई-टपाल सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची खरेदी करता येईल.

भारताच्या वाटचालीबाबत अभिमान जागृत करण्यासाठी केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या (एकेएएम) अंतर्गत हर घर तिरंगा अभियान सुरु केले. वर्ष 2022 मध्ये देशातील 23 कोटी घरांतील नागरिकांनी घरावर प्रत्यक्ष स्वरुपात तिरंगा फडकवला तर सहा कोटी लोकांनी एचजीटी संकेतस्थळावर त्यांचे सेल्फी फोटो अपलोड करुन हे अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी केले. टपाल विभागाने (डीओपी) हे अभियान देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आणि देशाच्या अत्यंत दुर्गम कोपऱ्यात देखील राष्ट्रध्वज उपलब्ध होईल याची सुनिश्चिती केली.

राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या या कार्यक्रमाशी देशातील नागरिक जोडले जावेत या उद्देशाने टपाल कार्यालये विविध जागरुकता उपक्रम (लोकसहभागविषयक कार्यक्रम) देखील आयोजित करणार आहेत. नागरिकांना या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन नव्या भारताच्या या महान कार्यक्रमाचा भाग होता येईल.

नागरिक त्यांच्या घरावर तसेच कार्यालयांवर फडकवलेल्या राष्ट्रध्वजासह सेल्फी फोटो काढून #IndiaPost4Tiranga, #HarGharTiranga, #HarDilTiranga या हॅशटॅगसह समाजमाध्यमांवर अपलोड करू शकतील.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content