Homeहेल्थ इज वेल्थदर महिन्याला आजच्या...

दर महिन्याला आजच्या दिवशीच ‘स्वस्थ मन, स्वस्थ घर’ मेळे!

निरोगी जीवनाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या “स्वस्थ मन, स्वस्थ घर” (निरोगी मन निरोगी घर) मोहिमेचा एक भाग म्हणून, दर महिन्याच्या आजच्या दिवशी, म्हणजेच 14 तारखेला देशभरातल्या संपूर्ण 1.56 लाख आयुष्मान भारत – आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

या देशव्यापी आरोग्य मेळ्यांचा एक भाग म्हणून योग, झुंबा, टेलीकन्सल्टेशन (दूरध्वनीवरून वैद्यकीय माहिती देणे), पोषण अभियान, असंसर्गजन्य रोग तपासणी आणि औषध वितरण, सिकलसेल रोगतपासणी यासारखे उपक्रम हाती घेतले जातील. याच अनुषंगाने, 14 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व आयुष्मान भारत आरोग्य केंद्रांमध्ये सायकल जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. यामध्ये सायक्लोथॉन, सायकल रॅली किंवा सायकल फॉर हेल्थ आदी कार्यक्रम होतील. शारीरिक आणि मानसिक स्‍वस्‍थता याच्याशी निगडित विविध विषय तसेच पर्यावरणस्नेही वाहतूक यासंदर्भात यावेळी जागरूकता आणि प्रचार केला जाईल.

आपल्या आरोग्याबाबत जागरूक असणाऱ्यांना तसेच सायकलिंग प्रेमींना कळकळीचे आवाहन करत असताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी सर्व नागरिकांनाही त्यांच्या जवळच्या आयुष्मान भारत आरोग्य केंद्रांमध्ये आयोजित सायकलिंग कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. “आपले शरीर निरोगी, तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी सायकलिंग हा एक उत्तम मार्ग आहे.”, “तुम्हाला वाटेल तितकी लांब किंवा कमीतकमी अंतरापर्यंत सायकल चालवा, पण सायकल नक्की चालवा!”, असे आवाहन डॉ. मांडविया यांनी केले आहे.

“स्वस्थ मन, स्वस्थ घर” (निरोगी मन निरोगी घर) ही नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023पर्यंत वर्षभर चालणारी मोहीम आहे. ही मोहीम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, आरोग्य आणि निरोगी जीवनपद्धतीला प्रोत्साहन देईल. ही मोहीम नवीन राष्ट्रीय आरोग्य धोरण, 2017 याचाच एक भाग आहे. त्यात प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तंदुरुस्ती आणि निरोगी जीवन जगणे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा उद्देश असलेल्या फिट इंडिया मोहीम 2019चा एक भाग म्हणूनही हा उपक्रम काम करेल.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content