Homeब्लॅक अँड व्हाईटफोर्ब्सच्या यादीत एनटीपीसी...

फोर्ब्सच्या यादीत एनटीपीसी आता 433व्या स्थानावर!

एनटीपीसी (NTPC) म्हणजेच राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ  या भारताच्या सर्वात मोठ्या वीज निर्मिती कंपनीने, फोर्ब्सच्या 2023 च्या ‘द ग्लोबल 2000” यादीमध्ये 52 क्रमांकांनी झेप घेत  433 वे स्थान प्राप्त केले आहे. 2022 मधल्या 485 व्या क्रमांकावरून केवळ एका वर्षात 52 क्रमांकांनी घेतलेली झेप, एनटीपीसी ही जागतिक बाजारपेठेत एक मजबूत शक्ती म्हणून उदयाला आल्याचे निदर्शक आहे. कंपनीचा स्थिर विस्तार, भक्कम आर्थिक स्थिती आणि उत्कृष्टतेसाठी सातत्यपूर्ण वचनबद्धता याचा हा दाखला आहे.

“द ग्लोबल 2000” यादी, विक्री, नफा, मालमत्ता आणि बाजार मूल्य या चार प्रमुख निकषांच्या आधारे जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांची क्रमवारी ठरवते. भारतीय कंपन्यांचा विचार करता, एनटीपीसी कंपनी, 2023 च्या यादीत सर्वात मोठ्या भारतीय कंपन्यांच्या श्रेणीत, एक स्थान पुढे जात 10 व्या क्रमांकावर आहे. ही क्रमवारी भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून एनटीपीसी चे स्थान अधिक मजबूत करते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content