Homeकल्चर +पीएमसी सॅटेलाईट आवृत्ती...

पीएमसी सॅटेलाईट आवृत्ती आता हिंदीमध्ये!

देशातील आध्यात्मिक विज्ञानाच्या प्राचीन ज्ञानाची शक्ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी पिरॅमिड मेडिटेशन चॅनेल (पीएमसी) ही जगातील पहिली आध्यात्मिक विज्ञान व जीवनशैली वाहिनी तिच्या सॅटेलाईट आवृत्तीमध्ये हिंदीमध्ये पाहता येणार आहे.

पीएमसी हिंदी वाहिनी जिओ टीव्ही, सिटी केबल, डेन नेटवर्क, फास्ट वे, एनएक्सटी/इन डिजिटलवर २४X७ प्रक्षेपित केली जात आहे. या वर्षीच्या सुरुवातीला हिंदीमध्ये सुरुवात करण्यात आल्यापासून आता ३ कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये ही वाहिनी पाहिली जात आहे. आनापानसति ध्यान योगाच्या साधकांनी प्रचंड संख्येने या वाहिनीला सबस्क्राईब केले आहे. पिरॅमिड एनर्जीपासून अनेकांना लाभ मिळत आहेत. भारतातील पहिली आधुनिक आध्यात्मिक विज्ञान वाहिनी आता राष्ट्रभाषेमध्ये उपलब्ध असून, ही पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुव्हमेंटची अधिकृत हिंदी मीडिया विंग आहे.

पीएमसी हे परिवर्तनकारी प्रसिद्धीमाध्यम आहे. मानवजातीला हिंसेपासून अहिंसेकडे, धार्मिक अंधविश्वासापासून वैज्ञानिक आणि आध्यात्मिक-वैज्ञानिक प्रयोग व तर्काकडे, दिवाळखोर भौतिकवादापासून भव्य मध्यम मार्गापर्यंत, सरतेशेवटी मांसाहारापासून शाकाहार स्वीकारण्यापर्यंत नेऊन परिवर्तन घडवून आणणे, या वाहिनीचा उद्देश आहे. ‘सत्य जसे आहे तसे’ प्रस्तुत करणे या वाहिनीचे लक्ष्य आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content