Homeकल्चर +‘राणी बागे’त आता...

‘राणी बागे’त आता विद्यार्थीही घेत आहेत वनस्पतिशास्त्राचे धडे!

मुंबईतले भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच पूर्वीची ‘राणीची बाग’ मुंबईकरांसाठी सहलीचे आवडते ठिकाण आहे. उद्यानातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी आणि प्राणिसंग्रहालयातील निरनिराळे प्राणी पाहण्यासाठी शनिवार, रविवारी प्रचंड गर्दी उसळते. मात्र या उद्यानात आणि प्राणिसंग्रहालयात केवळ विरंगुळा आणि मनोरंजन होत नसून, येथे विद्यार्थ्यांना शालेय सहलीमार्फत विविध प्रकारचे ज्ञान आणि माहितीही उपलब्ध होत आहे. काही महाविद्यालयीन विद्यार्थी येथे प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्राचा चिकित्सक अभ्यासही करायला येत आहेत.

मुंबईकरांचा संपूर्ण आठवडा धावपळीत आणि दगदगीत जातो. त्यामुळे  सार्वजनिक सुटीच्या दिवशी अथवा शनिवार, रविवारी या उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबईकर हमखास भेट देतात. येथील निसर्गसंपदा, प्राण्यांचा वावर, पक्ष्यांचा किलबिलाट यातून मुंबईकरांना व पर्यटकांना नितांत आनंद मिळतो.

या उद्यान व प्राणिसंग्रहालयातील विविध प्रकारची झाडे, झुडपे, फुलझाडे, दुर्मिळ वनस्पती, देशी-परदेशी प्रजातीची फुले आणि फळझाडे आदींचा अभ्यास करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांच्या सहली येत असतात. सोमवारी साऊथ इंडियन इज्युकेशन सोसायटीच्या घाटकोपर आणि माटुंगा येथील दोन शाळेच्या एकूण दोनशे विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह बागेतील जपानी उद्यानाला भेट दिली. या उद्यानातील विविध रोपांची, झुडपांची, झाडांची माहिती जाणून घेतली. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी विद्यार्थ्यांना उद्यानाविषयी, निरनिराळ्या फुलझाडांविषयी माहिती दिली. वनस्पतिशास्त्राबाबत जे ज्ञान, माहिती शाळेच्या चार भिंतीत मिळाली नसती ती आज उद्यानात मिळाली, अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दिली.

राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी उद्यानविद्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी या उद्यानात येत असतात. काही विद्यार्थी वनस्पतिशास्त्राचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास करण्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानाची निवड करीत आहेत. निसर्गसंपदा आणि विविध वनस्पतींच्या प्रजाती एकाच ठिकाणी अभ्यासाला मिळत असल्याने या विद्यार्थ्यांची अभ्यासाविषयक रुची वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील वंदना यादव (एमएससी, वनस्पतिशास्त्र विभाग), कल्याण येथील बी. के. बिर्ला ऑटोनॉमस महाविद्यालयातील सायली राहतवाल आणि नक्षत्रा शिंदे (पर्यावरणशास्त्र विभाग) या विद्यार्थिनी उद्यानातील रोपांचे वर्गीकरण आणि ओळख, उद्यानातील रोपांचे संगोपन तसेच पक्ष्यांचे जीवनमान, झाडांचे महत्त्व आणि फुलपाखरे आदींचा अभ्यास करताहेत. उद्यान अधीक्षक परदेशी आणि येथील अभ्यासक, अधिकारी, कर्मचारी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील अभ्यासक विद्यार्थिनी जुलीया कनेकोदेखील उद्यानात आठ दिवसांसाठी अभ्यास दौऱ्यावर येऊन गेली.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content