Homeबॅक पेजआता ओडीओपी उत्पादने...

आता ओडीओपी उत्पादने ग्रोयोच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर!

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागांतर्गत (डीपीआयआयटी), एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) कार्यक्रमाने, गृहपयोगी वस्त्रे, सजावटीच्या वस्तू आदी विविध श्रेणींचा समावेश असलेल्या ओडीओपी म्हणून निवड झालेल्या उत्पादनांची ग्रोयो (Groyyo) च्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांना ऑनलाईन विक्री करता यावी यासाठी ग्रोयो कंपनीशी 3 जुलै, 2023 रोजी सहयोग केला.

या वन-स्टॉप ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर टॅगिंगचा उद्देश म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची ओळख बळकट करणे आणि ओडीओपी उत्पादनांना अधिक बाजारपेठ प्रदान करणे आहे. यामुळे विक्रेत्यांना खरेदीदारांकडून उत्पादनांच्या आवश्यकतांबद्दल अधिक जाणून घेण्याची आणि त्यांची उत्पादने जागतिक स्तरावर विक्रीयोग्य बनविण्याची संधी मिळते. यावेळी डीपीआयआयटी च्या संचालक सुप्रिया देवस्थळी यांनी कारागिरांना ग्राहकसंख्या विस्तारण्यासाठी सक्षम करण्याकरिता अशा सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. सरकार उद्योजकता आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देते, अशा सहकार्यातून कारागिरांना भरभराट होण्यासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करते असे मत त्यांनी व्यक्त केले. 

या मंचावर उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमधील सिरेमिक, केरळमधील कोझिकोड येथील नारळ उत्पादने, जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथील कानी शाल, छत्तीसगडमधील बस्तर येथील बेल मेटल क्राफ्ट यासारख्या देशाच्या विविध भागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कारागीर उत्पादनांचा विविधांगी संग्रह या व्यासपीठावर आधीच प्रदर्शित करण्यात आला आहे. पुढे जाऊन, या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या श्रेणींचा विस्तार आरोग्यविषयक, दागिने इ.उत्पादनांमध्ये होईल. 

सध्या, ओडीओपीने देशातील सुमारे 100 जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या 35 हून अधिक ब्रँडचा अंतर्भाव केला आहे. उत्पादनाची सुलभता आणि मागणी वाढविण्यासाठी या मोहिमेअंतर्गत अधिक विक्रेत्यांना एकत्रित आणणे हे ध्येय आहे. सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देत जिल्हा स्तरावर शाश्वत रोजगार निर्माण करणे हा एक जिल्हा एक उत्पादन कार्यक्रमाचा उद्देश आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्पादन निवडणे, ब्रँड करणे आणि त्याचा प्रचार करणे ही यामागील संकल्पना आहे.

Continue reading

ईक्षा देसाईंचे वयाच्या आठव्या वर्षींचे स्वप्न साकार! झाल्या ‘मिसेस इंडिया’!!

मुंबईतल्या अशोकवन, दहिसर (पूर्व) येथील मानसशास्त्रज्ञ ईक्षा देसाई यांनी वयाच्या आठव्या वर्षी पाहिलेले स्वप्न अखेर सत्यात उतरवले आहे. द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट 'मिसेस इंडिया विजेती २०२६' म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह समाजात आनंदाची लाट उसळली आहे. यासोबतच...

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना ३० नोव्हेंबरला?

महिला आरक्षणाला जोडून देशातल्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी आणि ही प्रक्रिया २०२९च्या लोकसभा निवडणुकीआधी पूर्ण करण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपासून संसदेचे चार दिवसांचे अधिवेशन होणार असल्याचे समजते. येत्या ३० नोव्हेंबरला लोकसभेचे एक दिवसाचे अधिवेशन होईल तर दोन डिसेंबरला राज्यसभेत एका...

‘मालवणी रोंबाट’चे प्रकाशन

कवी अरविंद परुळेकर लिखित 'मालवणी रोंबाट', या अनोख्या साहित्यकृतीचा भव्य प्रकाशन सोहळा काल रविवारी, मुंबईतल्या गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास एखाद्या कौटुंबिक मेळाव्याचे स्वरूप आले होते. कवि अशोक नायगावकर, प्रसाद कुलकर्णी, शशिकांत तिरोडकर, प्रख्यात...
Skip to content