Homeएनसर्कलआता १० हजारात...

आता १० हजारात खरेदी करा ६.८८ इंच डिस्प्लेचा स्मार्टफोन

पोको हा भारतातील आघाडीचा कार्यक्षमताकेंद्रित स्‍मार्टफोन ब्रँड पोको एम ७ फाइव्ह जीच्‍या लाँचसह पुन्‍हा एकदा किफायतशीर सेगमेंटमध्‍ये धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. हा पॉवरहाऊस स्‍मार्टफोन परवडणाऱ्या किंमतीत उत्तम वैशिष्‍ट्यांची मागणी करणाऱ्या व्यक्तींसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. ९९९९ रूपये किंमत असलेला पोको एम ७ फाइव्ह जी त्‍याच्‍या सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्‍प्‍ले, तसेच अल्‍ट्रास्‍मूद १२० हर्ट्झ अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट असलेला एकमेव स्‍मार्टफोन आहे. मनसोक्‍त मनोरंजनाचा, गेमिंगचा किंवा ब्राउजिंगचा आनंद घ्‍यायचा असो, हा डोळ्यांसाठी सर्वोत्तम अनुकूल वापराचा अनुभव देतो.

स्‍नॅपड्रॅगन ४ जेन २ चिपसेटची शक्‍ती, १२ जीबी रॅम (६ जीबी टर्बो रॅम) आणि ५१६० एमएएच बॅटरी असलेला हा स्‍मार्टफोन दीर्घकाळापर्यंत डिवाईसचा वापर करणाऱ्या वापरकर्त्‍यांसाठी सुलभ, विनाव्‍यत्‍यय कार्यक्षमता देतो. आकर्षक क्षणांना कॅप्‍चर करण्‍याची आवड असणाऱ्यांसाठी ५० मेगापिक्‍सल सोनी सेन्‍सर अंधूक प्रकाशातदेखील सुस्‍पष्ट व आकर्षक फोटो कॅप्‍चर करतो.

पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्‍हणाले की, भारतातील स्‍मार्टफोन बाजारपेठ विकसित होत आहे आणि आज वापरकर्ते तडजोड न करता अधिक मूल्‍याची अपेक्षा करतात. पोको एम ७ फाइव्ह जी किफायतशीर दरामध्‍ये फ्लॅगशिप कार्यक्षमता, आकर्षक डिस्‍प्‍ले आणि पॉवर-पॅक कॅमेरा देतो. या लाँचसह आम्‍ही स्‍मार्टफोन ऑफर करण्‍यासोबत भारतातील आधुनिक काळातील ग्राहकांसाठी किफायतशीर स्‍मार्टफोन अनुभवाला नव्‍या उंचीवरदेखील घेऊन जात आहोत.

प्रमुख वैशिष्ट्ये:

● स्‍नॅपड्रॅगन ४ जेन २ + १२ जीबी रॅम- भारतातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह गेमिंग, एडिटिंगचा आनंद घ्‍या आणि दैनंदिन टास्‍क्‍स करा.

● सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्प्‍ले- टीयूव्‍ही ऱ्हेनलँड ट्रिपल आय प्रोटेक्‍शनसह श्रेणीमधील सर्वात मोठ्या डिस्‍प्‍लेसह चित्रपट, रील्‍स आणि गेम्‍सचा अभूतपूर्व आनंद घ्‍या.

● ५० मेगापिक्‍सल सोनी सेन्‍सर- अंधूक प्रकाशातदेखील सुस्‍पष्‍ट व आकर्षक फोटो कॅप्‍चर करतो.

● ५१६० एमएएच बॅटरी + १८ वॅट फास्‍ट चार्जिंग (३३ वॅट इन-बॉक्‍स चार्जर)- दिवसभर बॅटरी कार्यरत राहते, तसेच काही मिनिटांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते.

● नेक्‍स्‍ट जनरेशनसाठी डिझाइन करण्‍यात आलेला डिवाईस- अत्‍यंत किफायतशीर किंमतीत जलद, फ्यूचर-रेडी फाइव्ह जी कनेक्‍टीव्हिटी.

फक्‍त ९,९९९ रूपयांमध्‍ये ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍ट, १०,९९९ रूपयांमध्‍ये ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍ट खरेदी करा. पहिल्‍या दिवसाच्‍या विक्रीसाठी ही स्‍पेशल किंमत आहे. या फोनची विक्री येत्या ७ मार्चला दुपारी १२ वाजल्‍यापासून फक्‍त फ्लिपकार्टवर सुरू होत आहे.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content