Homeएनसर्कलउत्तर भारतातील पहिला...

उत्तर भारतातील पहिला नदी पुनरुज्जीवन प्रकल्प ‘देविका’ पूर्णत्वाच्या जवळ!

देविका हा उत्तर भारतातील पहिला नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पूर्ण होण्याच्या बेतात आहे अशी माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज दिली. ‘नमामि गंगा’ प्रकल्पाच्या धर्तीवर, 190 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील पवित्र अशा देविका नदीची शुद्धता जपण्यासाठी स्वतंत्रपणे हाती घेतलेल्या द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्पासोबतच, देविका नदीची शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी अनेक दृष्टीने महत्त्वाचा असणारा एक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प देखील, देविका पुनरुज्जीवन प्रकल्पा अंतर्गत उभारण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मोठ्या विकासात्मक प्रकल्पांच्या यशस्वी पूर्ततेसाठी, समाजाच्या तळागाळाचे प्रतिनिधी म्हणून पी आर आय अर्थात पंचायत राज संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही त्यायांनी  बैठकीत सांगितले. बैठकीत उपस्थित पी आर आय च्या प्रतिनिधींनी मंत्र्यांसमोर अनेक समस्या मांडल्या आणि या समस्या कमीत कमी वेळेत सोडवण्याचे निर्देश, मंत्रीमहोदयांनी विभागांना दिले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content