Homeब्लॅक अँड व्हाईट'नोमॅडिक एलिफंट-23'ला मंगोलियात...

‘नोमॅडिक एलिफंट-23’ला मंगोलियात प्रारंभ!

43 जवानांचा समावेश असलेली भारतीय लष्कराची तुकडी नुकतीच मंगोलियाला रवाना झाली. हे दल द्विपक्षीय संयुक्त लष्करी कवायतींच्या “नोमॅडिक एलिफंट-23” च्या 15 व्या सत्रात सहभागी होणार आहे. या कवायती 17 ते 31 जुलै 2023 या कालावधीत मंगोलियातील उलानबाटार येथे आयोजित केल्या जाणार आहेत. नोमॅडिक एलिफंट (NOMADIC ELEPHANT) हा एक वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो मंगोलिया आणि भारतात आलटून पालटून आयोजित केला जातो, या कवायतींचे यापूर्वीचे सत्र ऑक्टोबर 2019 मध्ये बाक्लोह येथील स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते.

मंगोलियन सशस्त्र सेना युनिट 084 चे सैनिक आणि जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे भारतीय सैन्याचे सैनिक या सरावात सहभागी होणार आहेत. भारतीय लष्कराची तुकडी 16 जुलै 23 रोजी भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानाने उलानबाटर येथे पोहोचली. सकारात्मक लष्करी संबंध निर्माण करणे, सर्वोत्कृष्ट पद्धतींची देवाणघेवाण करणे, आंतर-कार्यक्षमता, सौहार्द, सलोखा आणि दोन्ही सैन्यांमधील मैत्री विकसित करणे हा या सरावाचा उद्देश आहे. सरावाची प्राथमिक संकल्पना संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार पर्वतीय भूभागात दहशतवादविरोधी कारवाया यावर लक्ष केंद्रित करेल.

या कवायतींमध्ये प्लाटून स्तरीय फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज (FTX) समाविष्ट आहे. तसेच  भारतीय आणि मंगोलियन सैन्य त्यांचे कौशल्य आणि क्षमता वाढविण्यासाठी त्यांना आखून दिलेल्या विविध प्रशिक्षण उपक्रमांमध्ये सहभागी होती . अशा उपक्रमांमध्ये धैर्य वाढवणे, रिफ्लेक्स फायरिंग, रूम इंटरव्हेंशन, लहान तुकडी रणनीती आणि रॉक क्राफ्ट प्रशिक्षण यांचा समावेश असतो. दोन्ही देशांचे सैनिक परस्पर युद्ध कौशल्याचे अनुभव प्राप्त  करतील.

भारत आणि मंगोलिया या देशांमध्ये प्रादेशिक सुरक्षा आणि सहकार्यासाठी सामायिक वचनबद्धता आहे. नोमॅडिक एलिफंट-23 (NOMADIC ELEPHANT-23) हा सराव  भारतीय लष्कर आणि मंगोलियन लष्कर यांच्यातील संरक्षण सहकार्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होऊ शकतील.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content