Homeएनसर्कलनितीन गडकरी यांनी...

नितीन गडकरी यांनी केला नव्या कार सुरक्षा मूल्यांकनाचा शुभारंभ!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्ली येथे भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी), या कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम नवीन कारच्या मूल्यांकनासाठी असून, भारतातील 3.5 टन वजनापर्यंतच्या वाहनांसाठी सुरक्षा मानकांची वाढ करून, रस्ते सुरक्षा वाढवणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, सुरक्षित कार खरेदी करताना उत्तम निवड करण्यासाठी  ग्राहकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाउल आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भारत एनसीएपी कार्यक्रम भारतामधील वाहनांची सुरक्षा आणि गुणवत्तेला मोठी चालना देईल, आणि त्याच वेळी अधिकाधिक सुरक्षित वाहनांची निर्मिती करण्यासाठी वाहन निर्मात्यांमधील (OEMs) निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देईल. ते म्हणाले की भारत एनसीएपी आणि AIS-197 अंतर्गत नवीन सुरक्षा व्यवस्था उत्पादक आणि ग्राहक दोघांच्याही फायद्याची आहे, त्याच बरोबर आपल्या नागरिकांचे जीवित रक्षण करण्यासाठी आणि आपल्या वाहन उद्योगाला जगातील पहिल्या क्रमांकाचे वाहन उत्पादन केंद्र बनवण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाउल आहे. 

हा कार्यक्रम 3.5T GVW पेक्षा कमी M1 श्रेणीतील परवाना प्राप्त मोटार गाड्यांसाठी लागू आहे. हा एक ऐच्छिक कार्यक्रम आहे.

हा कार्यक्रम 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल आणि ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (AIS). 197 वर आधारित असेल. स्पर्धात्मक सुरक्षा सुधारणांची परिसंस्था निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असून, यामुळे ग्राहकांमध्ये जागरुकता वाढेल. वाहनाच्या कामगिरीचे क्रॅश चाचणीवर आधारित तुलनात्मक मूल्यांकन केल्यावर, उपलब्ध माहितीनुसार ग्राहक निर्णय घेऊ शकतील.

एनसीएपी ने वाहन उत्पादकांना जागतिक सुरक्षा मानकांची वाहने तयार करण्याची संधी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (CIRT) हा कार्यक्रम राबवणार असून, लाभार्थींबरोबर सल्ला-मसलत केल्यानंतर तो विकसित करण्यात आला आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content