Homeकल्चर +मुंबई महापालिका खात्यांतर्गत...

मुंबई महापालिका खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेत ‘निर्वासित’ सर्वप्रथम!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार खात्याच्‍या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५१व्या  आंतरविभागीय खात्‍यांतर्गत नाट्यस्पर्धेत पालिकेच्या ‘आर मध्य’ विभागाने सादर केलेल्या ‘निर्वासित’ या नाटकाला प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अनुप येरुणकर यांना ‘जेंडर अँड आयडेंटिटी’ या नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आणि प्रियांका जाधव यांना ‘निर्वासित’ या नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले.

पालिकेच्या कामगार खात्याच्‍या वतीने ५१वी आंतरविभागीय खात्‍यांतर्गत नाटस्‍पर्धा २१ फेब्रुवारी २०२३ ते २९ मार्च २०२३ या कालावधीत मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटयगृह, विलेपार्ले येथे आयोजित करण्‍यात आली होती. या नाटयस्‍पर्धेसाठी परिक्षक म्‍हणून दीपश्री चाफेकर, अनंत सुतार, मंगेश नेहरे यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय कामगार कल्याण अधिकारी प्रवीण नगराळे आणि त्यांच्या चमूने विशेष परिश्रम घेतले.

यंदाच्या नाट्यस्‍पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

उत्‍कृष्‍ट नाटयप्रयोग-

१) निर्वासित (सहायक आयुक्त, आर मध्य विभाग), (प्रथम क्रमांक)

२) माझा खेळ मांडू दे (कर निर्धारक व संकलक मुख्यालय), (द्वितीय क्रमांक)

३) जेंडर अँड आयडेंटिटी (अधिष्ठाता, रा. ए. स्मा. रुग्णालय), (तृतीय)

४) लोकोमोशन (सहायक आयुक्त, ए विभाग), (उत्‍तेजनार्थ)

५) आत्मकथा (जलअभियंता), (उत्‍तेजनार्थ)

उत्‍कृष्‍ट अभिनेता-

१) अनुप येरुणकर, जेंडर अँड आयडेंटिटी, (प्रथम)

२) अजिंक्य नंदा, निर्वासित, (द्वितीय)

३) किरण पाटील, घंटानाद, (तृतीय)

उत्‍कृष्‍ट अभिनेत्री-

१) प्रियांका जाधव, निर्वासित, (प्रथम)

२) अपर्णा शेट्ये, माझा खेळ मांडू दे, (द्वितीय)

३) वंदना गानू, घंटा (तृतीय)

उत्‍कृष्‍ट रंगभूषा–

भरत बेंडगुळे (प्रथम)

उत्‍कृष्‍ट वेशभूषा–

रुबी जेम्स, शुधाग्नी (प्रथम),

तृप्ती गिरकर, जेंडर अँड आयडेंटिटी (द्वितीय) 

लक्षवेधी भूमिका–

महेश अनुदत्त, इच्छा माझी पुरी करा (प्रथम क्रमांक)

उत्‍कृष्‍ट नाटयलेखन-

१) निर्वासित (प्रथम)

२) माझा खेळ मांडू दे (द्वितीय)

३) जेंडर अँड आयडेंटिटी (तृतीय)

उत्‍कृष्‍ट नेपथ्‍य-

१) संदेश जाधव, शुधाग्नी (प्रथम)

२) जयेश पवार, थोडसं लॉजिक थोडसं मॅजिक (द्वितीय)

उत्‍कृष्‍ट संगीत-

१) महेंद्र मांजरेकर, ती रात्र (प्रथम)

२) कृणाल तांबे, सुरू (द्वितीय)

उत्‍कृष्‍ट प्रकाशयोजना-

१) प्रकाश गोठवणकर, निर्वासित (प्रथम)

२) राजविलास इंगळे, आत्मकथा (द्वितीय)

उत्‍तेजनार्थ पारितोषिक (पुरूष)-

१) वैभव कदम, निर्वासित

२) अमित वैती, जेंडर अँड आयडेंटिटी 

३) विनय चिंदवडकर, पी 

४) नारायण पोत्रेकर, इच्छा माझी पुरी करा 

५) कुणाल तांबे, सुरू 

६) गणेश भालेराव, प्रश्न कायद्याचा आहे

७) प्रवीण भार्गव

८) रोहित पवार, ती रात्र 

९) नरेश कांबळे, शुधाग्नी 

१०) महेंद्र पवार , लोकोमोशन

११) संदेश जाधव, निर्वासित

१२) प्रथमेश भोसले, चेकमेट

उत्‍तेजनार्थ पारितोषिक (स्‍त्री)-

१) श्रुतिका शिंदे, निर्वासित

२) श्रद्धा पोतनीस, माझा खेळ मांडू दे 

३) मृदुला अय्यर, लोकोमोशन

४) स्नेहा ठोंबरे, इच्छा माझी पुरी करा

५) पूजा पाचरकर, सुरू

६) अर्चना कदम, थोडसं लॉजिक थोडसं मॅजिक 

७) प्रणया गायकवाड, वाहते हि दुर्वांची जोडी 

८) कल्पना भिसे, ती रात्र 

९) भावना रहाटे, शुधाग्नि 

१०) अनुष्का शिनारे, संगीता

११) विभावरी राणे, प्रश्न कायद्याचा आहे

१२) भारती रेगे-सावंत, चेकमेट

१३) संपदा सोनटक्के, आत्मकथा

१४) जुईली मेश्राम, निलवंती 

१५) मंगला जाधव, धुम्मस 

कामे सांभाळून अभिनय करणे कौतुकास्पद – सुबोध भावे

मुंबई हे जागतिक कीर्तीचे शहर असून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन मोठया हिमतीने या महानगराचे व्यवस्थापन करत आहे. न थकता अविरतपणे नागरी सेवासुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेचा प्रत्येक अधिकारी-कर्मचारी आनंदाने करत आहे. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या दुनियेत आपल्या कामाची जबाबदारी सांभाळून उर्वरित वेळेत नाटकामध्ये सहभागी होऊन अधिकारी-कर्मचारी नाट्यकला जोपासतात. सतत ५१ वर्षे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कलागुणांची जोपासना करतात, ही बाब खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नामवंत नाटयसिनेकलावंत सुबोध भावे यांनी केले.

पालिकेच्या कामगार विभागाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५१व्‍या आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धा सन २०२२-२३चा पारितोषिक वितरण समारंभ सुबोध भावे यांच्या हस्ते नुकताच मुंबईतल्या भायखळा येथील लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे नाटयगृह येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पालिका सहआयुक्त (सामान्‍य प्रशासन विभाग) मिलिन सावंत उपस्थित होते.

अवाढव्य पसरलेली आपली मुंबई महानगरी ही खऱ्या अर्थाने स्वप्ननगरी आहे. विविध स्वप्ने उराशी बाळगून भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक या मुंबई महानगरीत येत असतात. अव्याहतपणे काम करणारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा मुंबईच्या पावणेदोन कोटी लोकसंख्येसाठी नागरी व्यवस्थापन करते, हे अभिमानास्पद आहे. या रहाटगाड्यातही अधिकारी-कर्मचारी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून, कार्यबाहुल्यातून वेळ काढून नाट्यस्पर्धेत नुसते सहभागी न होता बक्षिसे मिळवितात, विविध कलाप्रकारांची जोपासना करतात. पालिकेत अनेक उत्तम कलाकार मंडळी आहेत, ही खरोखरच विलक्षण बाब आहे. प्रत्येक कलावंत हा माणसाचा जीवनानुभव आपापल्या पद्धतीने प्रकट करीत असतो, असे भावे म्हणाले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालिकेचे सहआयुक्त मिलीन सावंत म्हणाले की, या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले, याचा मनस्वी आनंद होत आहे. विविध नागरी सेवा सुविधा देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील कलागुणांच्या विकासासाठीही कार्यरत असते. आपला कर्मचारीवर्ग विविध भावस्पर्शी विषयांवर नाटके बसवितो. नाट्य कलेच्या विविध प्रकारात आपले कर्मचारी पारंगत आणि निपुण आहेत, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.‌ आपण कोणत्याही प्रकारचे जरी काम करीत असलो, तरी आपल्या कार्यात माणुसकीचा स्पर्श असला, तरच आपले कार्य अतिशय उत्कृष्ट होऊन आपल्यामध्ये सकारात्मक बदल होत असतो. नाट्यस्पर्धेतून मिळालेला आनंद, ऊर्जा घेऊन नागरिकांना आपण उत्तमोत्तम सेवा देऊ.

प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कामगार विभागाच्या वतीने कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पालिका कर्मचाऱ्यांची शारीरिक व मानसिक स्थिती सुदृढ राहण्यासाठी नाटयस्पर्धा आयोजित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content