Homeटॉप स्टोरीफडणवीसांच्या शिष्टाईनंतर निलेश...

फडणवीसांच्या शिष्टाईनंतर निलेश राणे पुन्हा सक्रिय राजकारणात!

अखेर भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी झाली. भाजपा नेते निलेश राणे यांनी आपला सक्रिय राजकारणातल्या निवृत्तीचा निर्णय अखेर मागे घेतला आहे.

काल दसऱ्याच्या मुहूर्तावर भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपली ही भूमिका मांडताना कोणावरही दोषारोप न करता राजकारणात मन रमत नसल्याचे कारण पुढे करत निवृत्तीची घोषणा केली. या घोषणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपा नेते आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आणि निलेश राणे यांचे वरचेवर खटके उडत असल्यामुळे तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या राजकारणात निलेश राणेंना डावलले जात असल्यामुळे राणे यांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा काल रंगली होती.

राणे

त्यानंतर आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास स्वतः रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची त्यांच्या निवासस्थानी (अधीश बंगल्यावर) जाऊन भेट घेतली. यावेळी जवळजवळ तीन तास उभयतांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर हे दोघेही नेते एकाच गाडीतून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सारंग, या शासकीय निवासस्थानी पोहोचले. तेथे या तिन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ सव्वा तास चर्चा झाली. आपापसातले हेवेदावे आणि मतभेद तूर्तास बाजूला ठेवा. लोकसभा, त्यापाठोपाठ विधानसभा अशा विविध निवडणुका सध्या दृष्टीक्षेपात आहेत. या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशावेळी आपापसातले मतभेद योग्य नव्हेत, असे सांगत फडणवीस यांनी निलेश राणे यांचे मन वळवण्यात यश मिळवल्याचे सूत्रांनी  सांगितले.

बैठकीनंतर माध्यमांशी कोणीही नेते काहीही बोलले नाहीत. मात्र त्यानंतर निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि फडणवीस यांचे एकत्रित छायाचित्र माध्यमांकडे पोहोचते झाले. त्याचबरोबर भाजपाचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी निलेश राणे यांनी आपला राजकीय निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असल्याचे घोषित केले. त्यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्त्वाखाली सिंधुदूर्गमध्ये भाजपा अधिक मजबूत होईल, अशी आशाही जठार यांनी व्यक्त केली असल्याचे समजते.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content