Homeकल्चर +तब्बल १० वर्षांनंतर...

तब्बल १० वर्षांनंतर निलेश दगडेचा स्पार्टन ‘मुंबई श्री’वर कब्जा!

तब्बल दहा वर्षे जेतेपदाच्या हुलकावणीनंतर प्रतिष्ठेच्या ‘स्पार्टन मुंबई श्री’ किताबावर परब फिटनेसच्या निलेश दगडेने आपले नाव कोरले. ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डर्स असोसिशन आणि मुंबई सबर्बन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या स्पार्टन मुंबई श्री २०२३च्या स्पर्धेत निवेशने आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले. त्याने ७० आणि ८५ किलो वजनगटातील विजेते अनुक्रमे उमेश गुप्ता आणि अनिकेत पाटील यांना आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. त्याचा विजय अगदीच एकतर्फी झाला.

‘१००’ हा ट्रंक नंबर असणार्‍या निलेशने आपल्याकडे असणारे सौष्ठव यावेळी शंभर नंबरी सोने असल्याचा दाखला दिला. त्याच्या भीमकाय देहयष्टीने इतर गटातील सात विजेत्यांना अक्षरश: खुजे बनविले. निलेशला यंदा कोणतेच आव्हान असणार नाही याची कल्पना खेळातील जाणकार प्रेक्षकांना ‘प्री-जजिंग’च्या दरम्यानच आली होती. निलेश उंची, त्याच्या स्नायूंचे मोठे आकारमान आणि खास करून अप्पर बॉडीमुळे तो स्टेजवर येताच ‘हाच तो विजेता’ असे प्रेक्षकांचे शंभर टक्के मत बनले. ‘हंड्रेड, हंड्रेड, हंड्रेडच्या जयघोषाने अंधेरीचे शहाजीराजे क्रीडा संकुल दणाणून गेले. निलेशच्या एकूण सौष्ठवापैकी त्याच्या पाठीची म्हणजे बॅकचा जो नजारा होता तो क्वचितच पाहावयास मिळणारा असा होता. त्याने केलेल्या मेहनतीचे ते फलित होते.

निलेशकडून पराभूत झालेल्या उमेश गुप्ता (यु. जी. फिटनेस) आणि अनिकेत पाटील (सावरकर जिम) यांना पुढील काळात हा किताब जिंकण्यासाठी केव्हढी तयारी करावी लागेल याचा जणू पाठच शिकावयास मिळाले. उमेश त्याच्या ७० किलो गटामध्ये निर्विवाद विजेता होता. तीच गोष्ट ८५ किलो गटात अनिकेत पाटीलची. उमेशच्या पिंडर्‍या पट (मांड्या) आणि हॅमस्ट्रिंग (मांडीचे मागचे स्नायू) पाहण्याजोगे होते. अनिकेतचे प्रमाणबद्ध शरीर त्याला अव्वल स्थान देऊन गेले.

या दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार सोहळा शरीरसौष्ठव संघटनेचे अमोल कीर्तिकर, अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनिल शेगडे, विजय झगडे आणि स्पर्धेचे पुरस्कर्ते ऋषभ चोक्सी यांच्या उपस्थितीत पार पडला.

संघटनेने पेलले शिवधनुष्य

गेली दोन वर्षे मुंबई श्री होऊ न शकल्यामुळे यंदा स्पर्धेला कुणी पुरस्कर्ताच मिळत नव्हता. तेव्हा मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर आणि सरचिटणीस राजेश सावंत, सुनील शेगडे यांनी स्पर्धा दणक्यातच करायची, असे मनाशी ठरवत मुंबई श्रीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. मग एकेक करत सर्व प्रायोजकांना, हितचिंतकांना गाठून स्पर्धेला लागणारा निधी उभारला आणि मुंबई श्रीचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले.

महिलांमध्ये हर्षदा सरस

अलिकडच्या काळात महिला व्यायामाकडे वळू लागल्याने त्यांच्यासाठी घेतल्या जाणार्‍या स्पर्धा महिला वर्गाला प्रेरणादायी ठरू लागल्या आहेत. प्रेक्षकांमध्ये महिलांचे वाढते प्रमाण आणि प्रत्यक्ष सहभाग लक्षणीय ठरत आहे. महिलांच्या शरीरसौष्ठवामध्ये हर्षदा पवार (हर्क्युलस फिटनेस) हिने आपले वर्चस्व राखताना आपल्याच जिममधील किमया बेर्डेला मागे टाकले. तर महिलांच्या फिजिक स्पोर्ट्समध्ये रेणुका जनौतीने बाजी मारली. यामध्ये स्पर्धकांच्या शरीराचे एकूणच ‘सौंदर्य’ याला महत्त्व असते.

अलंकार, अनिकेतला यश

आजकाल आयटी क्षेत्रात, कॉम्प्युटरच्या विळख्यात अडकलेला युवा वर्ग व्यायामाला महत्त्व देऊ लागला आहे. याचे प्रमाण मेन्स फिजिक स्पर्धेमध्ये पाहावयास मिळाले. १७० सेंटिमीटर आणि १७० सेंटिमीटरवरील गटामध्ये अनिकेत सावंत (बॉडी वर्कशॉप) आणि अलंकार पिंगळे (दांडेश्वर व्यायामशाळा) यांनी कडव्या लढतीअंती विजेतेपद जिंकली. आकाश जाधव आणि मिनेश ठक्कर (माँसाहेब जिम) उपविजेते ठरले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content