Homeब्लॅक अँड व्हाईटराष्ट्रीय महामार्गांवर वापरली...

राष्ट्रीय महामार्गांवर वापरली जाणार प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली!

रस्ते सुरक्षा सुधारणे आणि अपघात घटनांना प्रतिसाद देण्याचा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, NHAI ने आपले सुधारित धोरण जारी केले आहे. याद्वारे सुधारित आणि भविष्यवेधी प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (एटीएमएस) मानके आणि तपशील 2023 ची अंमलबजावणी केली जाईल.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील नवीनतम शोधांचा उपयोग करून, राष्ट्रीय महामार्ग आणि द्रूतगती मार्गांवर रस्ते सुरक्षा आणि डिजिटल अंमलबजावणीत हा उपक्रम सुधारणा करेल.

वाहतूक नियमांच्या डिजिटल अंमलबजावणीवर जोर दिला जाणार आहे. त्या अंतर्गत आधीच्या व्हीआयडीएस कॅमेऱ्यांच्या जागी नव्याने आलेली व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्शन अँड एन्फोर्समेंट सिस्टम (व्हिआयडीईएस) स्वीकारली जाईल. दुचाकीवरुन तिघांनी प्रवास करणे, हेल्मेट आणि सीटबेल्टचे उल्लंघन, चुकीच्या मार्गिका किंवा दिशेने वाहन चालवणे, महामार्गावरील प्राण्यांचा वावर आणि पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडणे यासह 14 वेगवेगळ्या घटना ओळखण्याची व्हिआयडीईएसची क्षमता आहे.

आढळलेल्या घटनेच्या आधारावर, मार्गावरील गस्ती वाहनांना किंवा रुग्णवाहिकांना व्हिआयडीईएस सतर्क करेल, ई-चलान तयार करेल, जवळपासच्या व्हेरिएबल मेसेजिंग बोर्डांना संबंधित संदेश पाठवेल किंवा जवळच्या प्रवाशांना ‘राजमार्गयात्रा’ मोबाइल अॅपद्वारे सूचना पाठवेल.

सर्वसमावेशक चित्रिकरण व्याप्तीसाठी, हे कॅमेरे राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 10 किमी अंतरावर स्थापित केले जातील, प्रत्येक 100 किमीवर विविध कॅमेरा चित्रिकरण एकत्रित करणारी अत्याधुनिक सूचना आणि नियंत्रण कक्ष आहेत.

याशिवाय वाहतूक देखरेख ट्रॅफिक कॅमेरा प्रणालीही अद्ययावत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 1 किमीवर ती बसवली जाईल.

प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणीसाठी माहिती प्रदान करून आपत्ती व्यवस्थापनात, एटीएमएस सक्रिय भूमिका बजावू शकतात. महामार्गाच्या स्थितीचे ऑनलाइन सामायिकरण आणि इतर महत्वाची माहिती देखील हे प्रदान करतील, त्यामुळे संस्था आणि महामार्ग वापरकर्त्यांना मदत होईल.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content