Homeब्लॅक अँड व्हाईटआता पूल-बोगद्यांचा आढावा...

आता पूल-बोगद्यांचा आढावा घेणार NHAIचा रचना विभाग!

पूल, बोगदे आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांची रचना आणि बांधणी यांचा परिणामकारक आढावा घेण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) रचना विभाग स्थापन केला आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील,पूल, बोगदे, इतर बांधकामे, आरई अर्थात रस्त्यांच्या बाजूला बांधल्या जाणाऱ्या मातीची धूप आणि भूस्खलन प्रतिबंधक भिंती (RE- री इनफोर्समेंट अर्थ किंवा रिटेनिंग  वॉल्स), यांची एकंदर रचना, नियोजन, बांधणी आणि देखभाल करण्यासाठी, धोरण आणि मार्गदर्शक तत्वे आखण्याचे काम, हा रचना विभाग करणार आहे.

प्रकल्पाची तयारी, नवीन पुलांचे बांधकाम, सध्याच्या जुन्या / मोडकळीला आलेल्या पुलांच्या स्थितीचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन, तसेच जुने मोडकळीला आलेले पूल, बांधकामे, बोगदे आणि आर ई भिंतींचा टिकाऊपणा तपासण्यासाठी आवश्यक उपकरणे, यांचा आढावा हा विभाग घेईल. स्टँडअलोन पूल म्हणजे झूलते पूल आणि जून 2023 नंतर सुरू झालेल्या डीपीआर म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवालाच्या टप्प्यावर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांचे देखील, हा विभाग पुनरावलोकन करेल.

याशिवाय, हा विभाग, बांधकाम पद्धती, तात्पुरती बांधकामे, 200 मीटरपेक्षा जास्त अंतरावर पूलाच्या बांधकामांचे सुटे भाग उचलण्याच्या आणि योग्य त्या ठिकाणी बसवण्याच्या पद्धती, आणि इतर  वैशिष्ट्यपूर्ण बांधकामे, यांचा धावता आढावाही हा विभाग घेईल.

याशिवाय, सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये 200 मीटरपेक्षा जास्त उंची असलेल्या सर्व पूल/ बांधकामांच्या रचनांचा आढावा घेतला जाईल. तसेच, 60 मीटरपेक्षा जास्त लांबीचे इतर पूल, 200 मीटरपेक्षा जास्त लांबीची बांधकामे आणि बोगदे, 10 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या आर ई भिंती आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण बांधकामे, यांचाही धावता आढावा घेण्यात येईल.

रचना पुनरावलोकनाचे काम हाती घेण्यासाठी, सल्लागार, पूलरचना तज्ज्ञ, बोगदा तज्ज्ञ, आर ई भिंत तज्ज्ञ, भू-तंत्रज्ञान तज्ज्ञ, माती/सामग्री चाचणी प्रयोगशाळा यांचा समावेश असलेल्या सल्लागारांचा चमू, यांची सेवा हा विभाग घेईल. प्रत्यक्ष रचना विभागामध्ये सुद्धा, आवश्यकतेनुसार बांधकामांच्या रचनांचा आढावा घेण्यासाठी, रचना तज्ज्ञ/संशोधक/ आय आय टी, एन आय टी या संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकत असलेले विद्यार्थी, यांचा समावेश असेल.

याव्यतिरिक्त विभाग, नॉएडा इथली भारतीय महामार्ग अभियंता अकादमी (IAHE) आणि पुण्याच्या रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग (IRICEL), यांच्यामार्फत, पूल, बोगदे आणि आर ई भिंतींची रचना, बांधकाम, पर्यवेक्षण आणि देखभाल या विविध पैलूंवर, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ  यांचे  अधिकारी आणि कंत्राटदार/सल्लागार यांच्या कर्मचाऱ्यांसाठी,  प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करेल.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content