Homeब्लॅक अँड व्हाईटघोकंपट्टीची पद्धत बाजूला...

घोकंपट्टीची पद्धत बाजूला सारणारे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण!

सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आनंददायी बनवणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे प्रमुख उद्दिष्ट आहे. हे धोरण अभ्यासाची घोकंपट्टी पद्धत बाजूला सारत, अनुभवाच्या आधारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करते, असे मत कोल्हापुरातील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डी. रवी दामोदर यांनी आज व्यक्त केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या लवकरच साजऱ्या केल्या जाणाऱ्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शाळांमधून गळतीचे प्रमाण कमी झाले आहे आणि धोरणातील विविध घटकांमुळे विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक अध्ययनाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे दामोदर यांनी सांगितले. या धोरणांतर्गत राबवण्यात येणाऱ्या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थी सहाव्या इयत्तेपासूनच आंतरराष्ट्रीय भाषा शिकत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कोल्हापुरातील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी पासून जर्मन भाषा शिकवली जात असून या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणार्‍या पायाभूत सुविधांचीही माहिती डी. रवी दामोदर यांनी दिली. या पायाभूत सुविधा दिव्यांग विद्यार्थ्यांना NEET, JEE इत्यादी यांसारख्या प्रतिष्ठित प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

एनईपी मध्ये समावेशक अध्ययनाची तरतूद असून दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील या उद्देशाने शाळांमध्येच काही विशेष सुविधा पुरवण्यात येतात. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना वावरता येईल अशाप्रकारे इमारतींची रचना करुन आणि विशेष शिक्षकांची व्यवस्था करुन हे शक्य केले आहे .कागल येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या ओंकार साठे-पाटील या दिव्यांग विद्यार्थ्याने प्रतिष्ठित समजली जाणारी आयआयटी प्रवेश परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केली. उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रपतींकडून दिला जाणारा बालश्री पुरस्कार देखील त्याने मिळवला आहे.

पुस्तकी शिक्षणाला कौशल्य प्रशिक्षणाची जोड देण्याच्या सरकारच्या निर्णयाने विद्यार्थ्यामध्ये असणाऱ्या कौशल्यांचा सन्मान करण्यात मदत होईल. यामुळे उद्योगांकडून होत असलेली कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण होईल आणि त्यातून औद्योगिक वाढ आणि समग्र आर्थिक विकास साधता येईल असे कोल्हापूर येथील रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा तिसरा वर्धापनदिन येत्या 29 जुलै 2023 रोजी होणार आहे. त्यानिमित्त देशभरात पत्रकार परिषदांची शृंखला आयोजित करण्यात येत आहे. या धोरणाच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या अनुषंगाने दिनांक 29 जुलै 2023 रोजी नवी दिल्लीत प्रगती मैदानावर आयटीपीओ येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय शिक्षा समागम या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा तीन दिवसीय कार्यक्रम, केंद्रीय शिक्षण आणि केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता या मंत्रालयांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे. या प्रसंगी पंतप्रधान विविध उपक्रमांचा शुभारंभही करणार आहेत.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content