Homeकल्चर +परिक्रमेनंतर आयएनएसव्ही तारिणीमधील...

परिक्रमेनंतर आयएनएसव्ही तारिणीमधील नाविक दल आज मायदेशी!

महासागर नौकानयन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत आंतरखंडीय आणि आंतर-महासागरीय प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून आयएनएसव्ही तारिणीमधील नाविक दल आज मायदेशी परतत असून गोव्यात या पथकाचे समारंभपूर्वक स्वागत केले जाणार आहे.

आयएनएसव्ही तारिणीमधील दोन महिला अधिकाऱ्यांसह सहा सदस्यीय नाविक दलाचे स्वागत करण्यासाठी भारतीय नौदलाने आज, 23 मे 2023 रोजी गोव्याच्या आयएनएस मांडोवी येथील भारतीय नौदल नाविक प्रशिक्षण केंद्रात (आयएनडब्ल्यूटीसी) येथे ध्वज (फ्लॅग इन) समारंभाचे आयोजन केले आहे. या समारंभाला केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी सन्माननीय अतिथी म्हणून तर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार आणि भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार राणी रामपालदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

आयएनएसव्ही तारिणी, सात महिन्यांच्या 17,000 सागरी मैलांच्या खडतर प्रवासानंतर मायदेशी परतत आहे. नाविक दलाचे विलक्षण धैर्य, लवचिकता आणि अतूट साहस यांचे प्रदर्शन या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात घडवले जाईल. नारी शक्तीचे (महिला सशक्तीकरण) सामर्थ्य दाखवून संपूर्ण मोहिमेत सहभाग घेतलेल्या लेफ्टनंट कमांडर डीलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए या दोन महिला अधिकाऱ्यांची कामगिरी विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. लेफ्टनंट कमांडर डीलना आणि लेफ्टनंट कमांडर रूपा यांनी गोवा ते रिओ डी जनेरियो, केपटाऊन मार्गे आणि पुन्हा परत असा जहाजावरून 188 दिवस प्रभावी प्रवास केला. इतर सहभागींमध्ये कॅप्टन अतुल सिन्हा, लेफ्टनंट कमांडर आशुतोष शर्मा, लेफ्टनंट अविरल केशव, कमांडर निखिल हेगडे, सीडीआर एमए झुल्फिकार, सीडीआर दिव्या पुरोहित आणि सीडीआर एसी डोक यांचा समावेश आहे.

भारतीय नौदल सक्रियपणे सागरी नौकानयनाला चालना देत आहे आणि ही मोहीम जगभरात परिभ्रमण करण्याच्या त्यांच्या मोहिमेचा एक भाग आहे. कॅप्टन दिलीप दोंदे हे 2009-2010मध्ये ही कामगिरी करणारे पहिले भारतीय ठरले, त्यानंतर सीडीआर अभिलाष टॉमी हे दोन परिक्रमांमध्ये भाग घेणारे पहिले आशियाई कॅप्टन ठरले आहेत. नुकत्याच झालेल्या गोल्डन ग्लोब रेस 2022मध्ये, सीडीआर अभिलाष टॉमी (निवृत्त) यांनी खडतर शर्यतीदरम्यान प्रचंड आव्हानांवर मात करत दुर्लभ कामगिरी करत दुसरे स्थान पटकावले.

सहा महिला नौदल अधिकाऱ्यांनी केलेल्या ‘नाविका सागर परिक्रमा’मुळे नौदलात आणि देशात सागरी  नौकानयनाची लोकप्रियता आणखी वाढली आहे. आयएनएसव्ही तारिणीचा सध्याचा प्रवास हा एकाच महिलेला संपूर्ण जगाच्या परिभ्रमणावर पाठवण्याच्या नौदलाच्या आगामी प्रयत्नांच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या अतुलनीय मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांची 24 ऑगस्ट 16 रोजी आयएनएस मांडोवी येथे स्थापन करण्यात आलेल्या महासागर  नौकानयन केंद्र (ओएसएन) येथे कठोर प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली. सागरी नौकानयन उपक्रमांना  प्रोत्साहन देणे आणि उपक्रम हाती घेणे हे भारतीय नौदल नौकानयन संघटनेच्या (आयएनएसए) अंतर्गत, नवी दिल्ली येथील महासागर नौकानयन केंद्राचे (ओएसएन) उद्दिष्ट आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content