Homeकल्चर +१२ ते १४...

१२ ते १४ एप्रिलदरम्यान मुंबईत संगीत नाटक महोत्सव

संगीत नाटकांची परंपरा जपण्यासाठी आणि त्या वैभवशाली रंगभूमीला पुन्हा एकदा रसिकांसमोर साकारण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे १२ ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीत संगीत नाटक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. विमल ट्रस्ट आणि दिलीप काटदरे यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

शुक्रवारी, १२ एप्रिलला अमृत नाट्य भारती, या मुंबई मराठी साहित्य संघ नाट्य शाखा प्रस्तुत ‘संगीत माऊली’ हे नाटक सादर होणार आहे. साहिल विशे, तन्वी गोरे, श्रेयस व्यास आणि डॉ. गौरी पंडित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाचे लेखक आणि गीतकार प्रदीप ओक असून दिग्दर्शन प्रमोद पवार आणि संगीत डॉ. राम पंडित यांचे आहे.

शनिवारी, १३ एप्रिल रोजी मराठी रंगभूमी, पुणे व गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट प्रस्तुत आणि कै. विद्याधर गोखले लिखित ‘संगीत सुवर्णतुला’ हे नाटक सादर होणार आहे. चिन्मय जोगळेकर, निनाद जाधव आणि अस्मिता चिंचाळकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन दिप्ती भोगले यांनी केले आहे.

रविवारी, १४ एप्रिलला कलाद्वयी, पुणे निर्मित प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘संगीत मत्स्यगंधा’ हे नाटक सादर होणार आहे. चिन्मय जोगळेकर, संजय गोसावी, ओंकार खाडिलकर आणि अस्मिता चिंचाळकर

यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन आशुतोष नेर्लेकर व संगीत कै. पं. जितेंद्र अभिषेकी आणि संगीत मार्गदर्शन संजय गोगटे यांचे आहे.

ही तिन्ही नाटके दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहामध्ये दररोज सायंकाळी ६ वाजता सादर होणार आहेत. नाटकांच्या प्रवेशिकांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत मिळतील. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२२-२४३०४१५० वर संपर्क करावा.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content