Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबई महापालिकेच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी...

मुंबई महापालिकेच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘फॉर्म–१६’ मिळणार मार्च २४पर्यंत

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना संबंधित नियमांनुसार दरमहा निवृत्तीवेतन देण्यात येते. याबाबत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पालिकेचे साधारण १ लाख ९ हजार ६४१ निवृत्तीवेतनधारक आहेत. यापैकी साधारण ७४ हजार ९५२ इतक्या निवृत्तिवेतनधारकांचे ‘प्रपत्र-१६’ (फॉर्म-१६) पालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या स्तरावर आयकर व परतावाविषयक कार्यवाही करणे गरजेचे असते. या अनुषंगाने निवृत्तीवेतनधारकांना ऑनलाईन पद्धतीने आर्थिक वर्ष २०२२-२३चे आयकरविषयक ‘प्रपत्र-१६’ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या आवश्यक ती संबंधित कार्यवाही करणे सुलभ होईल, अशी माहिती पालिकेच्या प्रमुख लेखापाल (कोषागार) विभागाच्या सुलोचना कवडे यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेतर्फे सालाबादप्रमाणे कर्मचारी तथा निवृत्तीवेतनधारक यांना आर्थिक वर्ष २०२२-२३चे आयकरविषयक ‘प्रपत्र-१६’ ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

१. सदर ऑनलाईन प्रपत्रे कोणत्याही इंटरनेट ब्राऊझरचा उपयोग करुन प्राप्त करता येऊ शकतील.

२. इंटरनेट ब्राऊझर ओपन केल्यानंतर ‘https://form16.mcgm.gov.in’ या संकेतस्थळावर लॉगीन करावे. 

३. दिलेल्या चौकोनामध्ये कर्मचारी संकेतांक नमूद करणे.

४. त्याखालील चौकोनामध्ये ‘पॅन’ क्रमांकाची अचूक नोंद करावी.

५. कर्मचारी संकेतांक आणि पॅन क्रमांकाची नोंद केल्यावर स्क्रीनवर दिसणाऱ्या captcha code दिलेल्या चौकोनामध्ये अचूक नोंद करणे.

 ६. नंतर ‘कन्फर्म’ (confirm) वर क्लिक करावे.

आपला ‘FORM 16’ दोन भागांमध्ये म्हणजे ‘भाग अ’ (PART A) आणि ‘भाग ब’ (PART B) स्क्रीनवर दिसेल. ‘भाग अ’ (PART A) हा आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून एकूण वजा केलेल्या आयकराशी संबंधित आहे आणि ‘भाग ब’ (PART B) हा आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील उत्पन्न, गुंतवणूक व त्यावरील आयकर यांचा तपशील आहे. त्यानंतर ‘डाऊनलोड’ (Download) वर क्लिक करावे.

‘भाग अ’ (PART A) मधील एकूण वजा केलेली आयकराची रक्कम, ‘भाग ब’ (PART B) मध्ये नमूद केलेल्या देय आयकराच्या रकमेतून वजा करुन योग्य ती आयकर देय किंवा परताव्याची रक्कम मिळवावी आणि निर्धारित वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न आयकर खात्याला सादर करावे. आर्थिक वर्ष २०२२-२३ चे प्रपत्र–१६ महापालिकेच्या संकेतस्थळावर फक्त ३१ मार्च २०२४ पर्यंत उपलब्ध राहील, याची निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी.

आयकर विभागाच्या नियम क्रमांक 26C नुसार आर्थिक वर्ष २०२३-२४करिता निवृत्तीवेतनधारकांनी केलेल्या आयकर बचतीच्या गुंतवणुकीची कागदपत्रे तसेच गृहकर्ज घेतले असल्यास वित्तीय संस्थेच्या ‘पॅन’ क्रमांकासह सर्व माहिती ‘प्रपत्र-१२ बीबी’ (12BB) मध्ये नमूद करुन ते पुढील पत्त्यावर दिनांक ३० सप्टेंबर २०२३पर्यंत पुढील पत्त्यावर सादर करावेः निवृत्तीवेतन (आयबी) विभाग, ‘ई’ विभाग कार्यालय, भायखळा (पश्चिम). मुंबई ४००००८.

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content