Homeबॅक पेजजपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने...

जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित होणार डोंगराळ रस्ते!

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या (जेआयसीए- जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था) तांत्रिक सहाय्याने, देशातील पर्वतीय रस्ते पायाभूत सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने पाच मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे डोंगराळ प्रदेशात उच्च-गुणवत्तेचे आणि शाश्वत रस्ते प्रकल्प सुनिश्चित करण्यासाठी तयार केली गेली असून यामुळे रस्त्यांचे जाळे सुधारेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.

ही मार्गदर्शक तत्त्वे भारतीय रस्ते काँग्रेस (आयआरसी – इंडियन रोड काँग्रेस ) द्वारे प्रकाशित करण्यात आली होती. ती 7 जुलै 2023 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत छत्तीसगडमधील रायपूर येथे संस्थेच्या 225 व्या मध्यावधी बैठकीच्या उद्घाटन समारंभात जारी करण्यात आली होती. यावेळी छत्तीसगडचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग (रस्ते विकास) चे महासंचालक व विशेष सचिव आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मार्गदर्शक तत्वांमध्ये  खालील विषयांबाबत डोंगराळ प्रदेशात रस्ते बांधणीसाठी तांत्रिक वैशिष्ठ्ये आणि सर्वोत्तम पद्धतीचा समावेश आहे.

1. डोंगराळ प्रदेशातील रस्त्यांचे नियोजन

2. प्रगत तंत्रज्ञानासह उतार संरक्षण आणि तटबंदी

3. डोंगराळ भागातील मुख्य रस्त्यांवरील बोगदा

4. प्रगत तंत्रज्ञानासह पर्वतीय पूल

5. पर्वतीय महामार्गांचे कार्यान्वयन आणि देखभाल व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक विकास सुलभ करण्यासाठी उत्तम रस्ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्रालय  आणि जेआयसीए  यांनी 2016 ते 2021 या कालावधीत “पर्वतीय प्रदेशातील महामार्गांबाबत क्षमता विकास प्रकल्प” राबविण्यास सहमती दर्शवली होती.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content