Homeब्लॅक अँड व्हाईट1 हजार कोटींहून...

1 हजार कोटींहून अधिकचा जीएसटी घोटाळा उघडकीस!

बनावट कंपन्या चालवणाऱ्या टोळ्यांच्या  विरोधात सुरू असलेल्या मोहिमेमध्ये, जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या जयपूर विभागाच्या अधिकार्‍यांनी दिल्लीस्थित एक मोठी गुन्हेगारी टोळी उघडकीस आणली आहे.

ही टोळी 569 बनावट कंपन्या चालवत होती आणि त्यांच्यामार्फत त्यांनी  प्रचंड फसवणूक करत 1,047 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट तयार केला होता. मुख्य सूत्रधार  ऋषभ जैन, वय 30, दिल्लीचा रहिवासी असून त्याने या बनावट कंपन्या चालवण्यासाठी 10 कर्मचारी नियुक्त केले होते. व्यापक पाळत आणि माहितीचे विश्लेषण केल्यानंतर, जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या जयपूर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्लीत या प्रमुख सूत्रधाराचा शोध घेण्यात आणि त्याला पकडण्यात यश आले.

या 569 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या टोळीने 6,022 कोटी रुपयांची करपात्र उलाढाल असलेल्या पावत्या जारी केल्या ज्यात 2,000 हून अधिक लाभार्थी कंपन्यांना 1,047 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट समाविष्ट आहे. यापैकी बहुतांश बनावट कंपन्या दिल्लीत असून राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा, आसाम आणि उत्तराखंड या 13 इतर राज्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या आहेत. आतापर्यंत या टोळीद्वारे आणि दलालांद्वारे वापरण्यात आलेल्या 73  बँक खात्यांवर टाच आणण्यात आली आहे.

ऋषभ जैनला  25.06.2023 रोजी अटक करण्यात आली आहे आणि आर्थिक गुन्हे न्यायालय, जयपूर येथे हजर करण्यात आले असता 7.07.2023 पर्यंत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content