Homeकल्चर +मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने...

मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने आयोजित केले मान्सून विचारमंथन!

मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने कुलाबा, मुंबई येथील अगस्त्य सभागृह, आयएनएचएस अश्विनी येथे नुकतेच दुसरे मान्सून विचारमंथन व्याख्यान आयोजित केले.

कमोडोर (डॉ) श्रीकांत केसनूर, व्हीएसएम हे निवृत्त नौदल अधिकारी यात प्रमुख अतिथी वक्ते होते. आपल्या 36 वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी अनेक कमांडिंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींमध्ये काम केले आहे आणि सागरी संचालन, प्रशिक्षण, नेतृत्व, मुत्सद्दीपणा आणि प्रशासनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे. ‘लीडरशिप लेसन्स ऑफ इंडियन नेव्हल आयकॉन्स: ॲडम आर एल परेरा अँड आदर ल्युमिनरीज’ या व्याख्यानात, कमोडोर केसनूर यांनी सामरिक, संचालनात्मक आणि धोरणात्मक पातळीवर नेतृत्वाचे महत्त्व सांगितले. ज्यामुळे भारतीय नौदलाच्या उभारणीत आणि यशस्वी नौदलाला आकार देण्यावर तसेच विविध संचालनात्मक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याचा फायदा झाला.

माजी नौदल प्रमुख दिवंगत ॲडम आर एल परेरा तसेच इतर दिग्गजांचे उदाहरण देऊन, त्यांनी आपल्या देशाच्या सागरी वारशावर त्यांचे असाधारण योगदान आणि त्यांचा चिरस्थायी प्रभाव अधोरेखित करत त्यांच्या जीवन प्रवासाचा तपशीलवार आलेख मांडला. प्रमुख पाहुणे, व्हाइस ॲडमिरल राजाराम स्वामीनाथन अतिविशिष्ट सेवा पदक, नौदल पदक प्राप्त नौदल प्रकल्प महासंचालक (मुंबई) यांच्या हस्ते अतिथी वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. नौदल कर्मचारी, इतिहासकार, विद्यार्थी आणि सागरी प्रेमींचा समावेश असलेला वैविध्यपूर्ण प्रेक्षकवर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता. हा संवाद अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरक आणि नेतृत्व आणि नौदल मूल्य प्रणालीमध्ये मौल्यवान माहिती प्रदान करणारा होता.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content