Homeएनसर्कलइलेक्ट्रिक वाहनांसाठी सुधारित...

इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुधारित चुंबक किफायतशीर..

संशोधकांनी सुधारित किफायतशीर किंमतीचे जड दुर्मिळ प्रदूषणमुक्त उच्च एनडी-एफई-बी (Nd-Fe-B) चुंबक तयार केले आहेत. या चुंबकांना इलेक्ट्रिक वाहनांसाठी जास्त मागणी असून ते ही वाहने अधिक किफायतशीर बनवू शकतात.

90%पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ब्रशलेस डीसी (बीएलडीसी) मोटर्स वापरल्या जातात ज्या दुर्मिळ पृथ्वी निओडीमियम आयर्न बोरॉन (एनडी-फे-बी) चुंबकांनी बनलेल्या असतात. 1984मध्ये सागावाने त्याचा शोध लावल्यापासून, एनडी-एफई-बी (Nd-Fe-B) चुंबक हा चुंबकीय गुणधर्मांच्या अपवादात्मक संयोजनामुळे बर्‍याच अनुप्रयोगांसाठी सर्वाधिक मागणी असलेला टिकाऊ चुंबकीय पदार्थ आहे.

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरलेले एनडी-एफई-बी (Nd-Fe-B) चुंबक 150 – 200oC इतक्या  उच्च तापमानात कार्य करतात आणि चुंबकीय गुणधर्म नाहीसे झाल्यास (डिमॅग्नेटायझेशन) उच्च प्रतिरोध दाखवणे आवश्यक असते, अशी क्षमता शुद्ध एनडी-एफई-बी (Nd-Fe-B) चुंबकांजवळ नसते. त्यामुळे डिस्प्रोशिअम (डीवाय) धातू डिमॅग्नेटायझेशनचा प्रतिरोध सुधारण्यासाठी मिश्रधातू म्हणून त्याला जोडला जातो. जगभरात, संशोधक महागडे डिस्प्रोशिअम धातू न जोडता एनडी-एफई-बी (Nd-Fe-B) चुंबकांची शक्ती (डिमॅग्नेटाइझेशनचा प्रतिरोध) वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. एनडी-एफई-बी (Nd-Fe-B) चुंबकाच्या दाण्यांमधली जागा “अचुंबकीय” घटकांसह योग्य उष्णता देण्याचे उपाय वाढवण्याच्या अनुषंगाने (ग्रेन बाउंडरी डिफ्यूजन) चुंबकांची शक्ती वाढवण्यासाठी संशोधन समुदायाने अवलंबलेले धोरण आहे.

इलेक्ट्रिक

अलीकडेच, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे स्वायत्त संशोधन आणि विकास केंद्र असलेल्या पावडर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स (एआरसीआय) या आंतरराष्ट्रीय अत्याधुनिक संशोधन केंद्रातील वाहन ऊर्जा साहित्य केंद्रातील संशोधकांनी Nd70Cu30 या  कमी द्रवणांक मिश्रधातूचा वापर करून ग्रेन बाउंड्री डिफ्यूजन प्रक्रियेद्वारे (जीबीडीपी) Nd-Fe-B मेल्ट-स्पन रिबन असलेल्या निओबियमची (Nb) शक्ती वाढवली आहे जी “अचुंबकीय” घटकासाठी स्त्रोत म्हणून कार्य करते.

एनबीच्या (Nb) अवक्षेपणामुळे, त्यांनी ग्रेन बाउंडरी डिफ्यूजन दरम्यान चुंबकीय दाण्यांमध्ये प्रतिबंधित वाढ नोंदवली आहे, जी चुंबकीय  कणांवर तांबे (सीयू) धातूचे संवर्धन सुलभ करते आणि एनडी-एफई-बी (Nd-Fe-B) पावडरच्या विचुंबकीकरणास वाढीव प्रतिरोध करण्यास मदत करते. मटेरिअल्स रिसर्च लेटरमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात,प्राप्त झालेल्या वाहन अनुप्रयोगांसाठी 150oC वर 1 Tचे शक्तीचे मूल्य इलेक्ट्रिक वाहन अनुप्रयोगांसाठी डिस्प्रोशिअम (डीवाय) धातूशिवाय चुंबक विकसित करण्यासाठी उपयुक्त धोरण ठरेल ज्यामुळे आयात बरीच कमी होईल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content