Homeपब्लिक फिगरमीराबाई चानू आणि...

मीराबाई चानू आणि बिंदियाराणी देवी घेणार अमेरिकेत प्रशिक्षण!

ऑलिम्पिक पदक विजेती भारोत्तोलक मीराबाई चानू आणि राष्ट्रकुल स्पर्धा पदकविजेती भारोत्तोलक बिंदियाराणी देवी यांच्या अमेरिकेत सेंट लुईस येथे प्रशिक्षण घेण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिंपिक सेलने नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. टॉप्स अर्थात टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम अंतर्गत या दोघींना आता या परदेशी प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहता येणार आहे.

सेंट लुईस स्क्वॉट विद्यापीठामध्ये डॉ. एरॉन हॉर्शिग यांच्या नेतृत्वाखाली या दोघी प्रशिक्षण घेतील. आगामी आशियाई खेळांच्या पार्श्वभूमीवर या दोघींच्या कौशल्य विकासावर शिबिरात मेहनत घेतली जाईल. 65 दिवसांच्या या प्रशिक्षण शिबिरात त्यांच्यासोबत भारतीय मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा आणि त्यांचे फिजिओथेरपिस्ट तेसनीम झय्याद असतील.

प्रशिक्षण

त्यांच्या विमान प्रवासाचा खर्च, राहण्याचा आणि निवासाचा खर्च, वैद्यकीय विमा, स्थानिक वाहतूक , व्यायामशाळेचा आणि वैद्यकीय खर्च सरकार करेल.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content