केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (CDSCO) आणि इक्वाडोरच्या Agencia Nacional de Regulation, Control Y Vigilancia Sanitria – ARCSA, डॉक्टर लिओपोल्डो इझक्विएटा पेरेझदरम्यान वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रातील सहकार्यावर नुकताच सामंजस्य करार झाला.

फायदा:
सामंजस्य करार दोन्ही बाजूंमधील नियामक पैलूंबद्दल अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत करेल आणि वैद्यकीय उत्पादनांच्या नियमनाच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यात आणि आंतरराष्ट्रीय मंचावर उत्तम समन्वय साधण्यास मदत करेल.

रोजगारनिर्मितीची संधी:
या सामंजस्य करारामुळे भारतातून औषधांची निर्यात वृद्धीसाठी नियामक पद्धतींमधील अभिसरण मदत करू शकेल आणि परिणामी औषध निर्माण क्षेत्रातील शिक्षित व्यावसायिकांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळण्यास मदत होईल.
आत्मनिर्भर भारत:
या सामंजस्य करारामुळे वैद्यकीय उत्पादनांची निर्यात सुलभ होईल ज्यामुळे परकीय चलन मिळू शकेल. हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल असेल.

पार्श्वभूमी:
CDSCO हे आरोग्य सेवा महासंचालनालयाचे एक अधीनस्थ कार्यालय आहे, जे आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागाचे संलग्न कार्यालय आहे. CDSCO हे भारतातील औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांसाठी राष्ट्रीय नियामक प्राधिकरण आहे. Agencia Nacional de Regulation, Control Y Vigilancia Sanitria – ARCSA, डॉक्टर लिओपोल्डो इझक्विटा पेरेझ ही इक्वाडोरमध्ये या उत्पादनांचे नियमन करणारी नियामक संस्था आहे.