Homeडेली पल्स2019-20मधल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना...

2019-20मधल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना ५व्यांदा परीक्षेची संधी

सन 2019-20मध्ये एमबीबीएसचे प्रथम शैक्षणिक वर्षातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) उपलब्ध करून दिली आहे. 2019-20 या काळात प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांना भेटून यासंदर्भात विनंती केली होती. कोविडविषयक तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन पवार यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे (NMC) पाठपुरावा व केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत विस्तृत चर्चा करून या विद्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी निर्माण करून दिली आहे.

या विद्यार्थ्यांना आधीच्या नियमांनुसार पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र 2019-20 या काळात कोविड-19 या आजाराच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात आणि देशात लॉकडाऊन असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालये बंद होती. त्यामुळे या काळातील एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. यामुळे अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नसल्याने त्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी निर्माण करून द्यावी, अशी भूमिका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केंद्रीय वैद्यकीय आयोगापुढे (NMC) मांडली. याविषयी आयोगाने चर्चा केली आणि डॅा. पवार यांच्या भूमिकेला मान्यता देत या विध्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनीही मान्यता दिली आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content