Homeकल्चर +१४ ऑगस्टला शाश्वती...

१४ ऑगस्टला शाश्वती मंडल यांचे गायन!

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता विदुषी शाश्वती मंडल यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. 

शाश्वती मंडल या ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका असून संगीताचे प्राथमिक शिक्षण त्यांनी त्यांची आई कमल मंडल यांच्याकडे घेतले. नंतर बाळासाहेब पूँछवाले यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली व त्यांच्याकडे टप्पा गायनाचे प्रगत शिक्षण घेतले. पूर्णिमा चौधरी यांच्याकडे ठुमरी, गुंडेचा बंधूंकडे ध्रुपद आणि सरबत हुसेन यांच्याकडे गझल गायकीचे प्रशिक्षण घेतले. त्या आकाशवाणीच्या टॅाप ग्रेड कलाकार असून प्रतिष्ठित संगीत संमेलनांमध्ये त्यांनी गायकी सादर केलेली आहे.

त्यांना सूरसिंगार संसदेतर्फे “सूरमणी” हा किताब मिळाला आहे. या कार्यक्रमामध्ये त्यांना अभय दातार तबला व डॅा. मौसम संवादिनीवर साथ करतील. अधिकाधिक रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content