Homeकल्चर +पूजा व साईनाथच्या...

पूजा व साईनाथच्या आवाजात ऐका ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’..

गावाच्या पारापासून ते मेट्रो सिटीच्या कॅफेपर्यंत कुठेही कट्टा टाकणाऱ्या तरुण-तरुणींच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासारख्याच आणखी तीन मुलभूत गरजा असतात. त्या म्हणजे, रिलेशनशिप स्टेट्स, करियरचा सक्सेस आणि वायफायचा स्पीड. यात रिलेशनशिप स्टेट्स सिंगल आहे की कमिटेड, याचा परिणाम करियरवर व्हायला वेळ लागत नाही आणि वायफाय स्पीडवरच तर तुम्ही सिंगलचे कमिटेड होणार की नाही, हे ठरत असतं.

आजच्या तरुणाईला आपलेच वाटतील असे सचिन, सायली आणि सुरेखा, या एकमेकांचे घनिषट दोस्त असणारे आणि त्याचबरोबर एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे, हे तिघेजण तुम्हाला भेटतील- ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’, या स्टोरीटेल मराठीच्या नव्या कोऱ्या करकरीत ऑडिओ सीरिजमध्ये. या ऑडिओ सीरिजला आवाज दिला आहे गुणी अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि उत्तम लेखक आणि अभिनेता असणाऱ्या साईनाथ गणुवाड याने..

ही सीरिज लिहिली आहे माधवी वागेश्वरीने. याआधीदेखील ‘करसाळ’ ही पहिली मल्टीव्हॉईस सीरिज तिने लिहिली होती. तिला एक वेगळा प्रयोग म्हणून पाहिलं गेलेलं आहे. ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ या सीरिजसाठी पूजा आणि साईनाथ यांनी विशेष मेहनत घेतली आहे. ही गोष्ट मराठवाडा आणि पुणे अशा दोन ठिकाणी घडते. त्यामुळे त्या-त्या व्यक्तिरेखांचे आवाज, भाषेचे बारकावे समजून, उमजून घेऊन त्याचबरोबर गोष्ट वाचनातून वेगवान ठेवण्याचे काम त्यांनी एकमेकांच्या मदतीनं पेलेलं आहे.

याबाबत पूजा ठोंबरे म्हणाली की, जेव्हा मी ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ची संहिता ऐकली तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडले. एकाच सीरिजमधल्या खूप साऱ्या पात्रांना मला आवाज द्यायचा हे समजल्यावर मी अधिकच उत्साही होते. त्या पात्रांचे व्हेरिएशन्स, त्यांच्यातील डिटेलिंग, बारीक, बारीक बारकाव्यांचे निरीक्षण नोंदवून त्या व्यक्तिरेखा फुलवण्याचा मी प्रयत्न केलाय.

या मालिकेत एकाचवेळी माझ्यापेक्षा कमी वयाची मुलगी, सुरेखाचं पात्र वाचलंय आणि त्याचवेळी मी तिच्या आईचंही पात्र वाचलंय. त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी अद्भुत होतं. हा अनुभव मी पहिल्यांदाच घेतलाय. माधवी वागेश्वरीने ही मालिका फारच अप्रतिम लिहिली आहे.

साईनाथ गणुवाड सचिन ह्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेविषयी सांगतो की, ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ ही गोष्ट ऐकूनच वाटलं की ही आजची गोष्ट आहे. गोष्टीत असणारे सुरेखा, सचिन, सायली हे आजूबाजूला बघितलेलेच वाटतात. त्यात सचिन गावाकडून पुण्यात, एमपीएससीसाठी आलेला मुलगा आहे. असे कित्येक सचिन मी जवळून पहिले आहेत. मीही त्यातलाच एक आहे. त्यामुळे त्या पात्राला जे वाटतंय ते समजून घ्यायला मदत झाली. पूजासोबत याआधी नाटक केलं होतं. आम्ही नाटकासारखीच पूर्ण गोष्ट वाचून तालीम केली. तालमीतच आम्हाला या व्यक्तिरेखांचे आवाज आणि लकबी सापडत गेल्या.

तरुण वयात आपल्यावर जिवापाड प्रेम करणारं, आपली वाट पाहणारं कोणीतरी असावं असं प्रत्येक मुलाला आणि मुलीला वाटत असतंच. परंतु प्रेमाचं नातं म्हटलं की, ते निभावण्याच्या जबाबदारीपासून मुलं पळू काढू लागतात. नात्याची जबाबदारी निभवण्याच्या थकव्यापेक्षा नात्यापासून, प्रेमापासून पळण्याचा थकवा जास्त असतो का? काय करायचं नेमकं? असा कॉम्प्लिकेटेड प्रश्न मुलांना पडतो आणि नातं तर हवंच, प्रेमही हवं.. त्यासाठी तयारी हवी.. पण नाही जमलं तर?.. मध्येच डाव मोडावा वाटला तर?.. नात्यासाठी समर्पण महत्त्वाचं की स्वत:साठीचं उत्तरदायित्व?.. काय करायचं नेमकं? असा प्रश्न मुलींना पडतो..

तुम्हालाही असेच प्रश्न पडत असतील. तुम्ही सिंगल असाल किंवा नसाल तरीही आवर्जून ऐका, सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड.. फक्त स्टोरीटेलवर!

Continue reading

‘अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा’ सन्मानसोहळा संपन्न

अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा हा अत्यंत उच्च दर्जाचा असून सातत्याने हे पुरस्कार गिरगांव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालणकर यांनी द्यावेत आणि समाजातल्या बुद्धिवंत, प्रतिभावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राहावे, अशा शब्दांत ज्येष्ठ...

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप!

महाराष्ट्रातल्या जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे नुकत्याच झालेल्या स्टेम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनीच्या पिल्लई एचओसी...

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...
Skip to content