Homeमुंबई स्पेशलप्रवासीभाडे नाकारणाऱ्या 28...

प्रवासीभाडे नाकारणाऱ्या 28 हजार रिक्षा-टॅक्सीचालकांचे परवाने होणार रद्द!

प्रवासीभाडे नाकारणे, विनागणवेश वाहन चालविणे, ज्यादा प्रवासी अशा गुन्ह्यांविरोधात 18 एप्रिल ते 02 मे या काळात मुंबईत चालविलेल्या मोहिमेत 48,417जणांविरुध्द ई-चलान कारवाई करुन पोलिसांनी 40,25,356 रुपये दंड वसूल केला. यात प्रवासीभाडे नाकारणे- 28814, विनागणवेश वाहन चालविणे- 1164, ज्यादा प्रवासी घेऊन वाहन चालविणे- 6268 आणि 12171 इतर गुन्ह्यांचा समावेश होता. यातील प्रवासीभाडे नाकारणाऱ्या 28814 चालकांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सहआयुक्त (वाहतूक) यांनी स्पष्ट केले आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात 29 एप्रिलला मुंबई आणि उपनगरात राबविलेल्या मोहीमेत दारु पिऊन गाडी चालविणाऱ्या 13 चालकांविरुद्ध कारवाई सुरु असून त्यांचे चालन परवाने रद्द करण्यात येत आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे- तब्रेज नानकाऊ (31), गोवंडी, रवि गोठाला (40) प्रभादेवी, गोविंद राठोड (35) 17 सी वरळी पोलिस कॉलनी, वृशाली मिस्त्री (26), माहीम पश्चिम, राहुल जयस्वाल (32) सायन कोळिवाडा, हसिब खान (32) वडाळा पूर्व, सुनिल विश्वकर्मा (29) धारावी, फिरोज रुस्तम (20) विक्रोळी पूर्व, हुसेन नियाजी (25), मिरा रोड पूर्व, सुनिल शर्मा ( 32) सांताक्रूज पश्चिम, मोहम्मद शेख (27), मालाड पश्चिम, स्वरुप मेहता ( 32), खेतवाडी, गिरगाव आणि मनोज विश्वकर्मा (30) दहीसर पूर्व. आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023च्या कलम 123अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

वाहतूक कोंडीवर नियंत्रण

दरम्यान, वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी मुंबईच्या काही भागात पुढीलप्रमाणे नियमन केले आहे.

माहीम– रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केल्यामुळे वाहतूककोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर शांतीदुर्गा सोसायटी ते मुच्यअल कॉलनी या पट्ट्यात समदिनी (2,4,6 तारखा) दक्षिण वाहिनीवर वाहने उभी करण्यात यावीत आणि विषमदिनी (1,3,5) रस्त्याच्या उत्तर वाहिनीवर वाहने उभी करण्यात यावीत, असा आदेश पोलिस उपायुक्त समाधान पवार यांनी जारी केला आहे. हे बदल 05 ऑक्टोबरपर्यंत लागू असतील. याचप्रमाणे घाटकोपर पश्चिमेस धर्मवीर संभाजी मार्गावर चिराग नगरजवळ गोल्डन बेकरी ते मच्छी मार्केट या पट्टयात सकाळी 11 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेश नसेल. हे बदल उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी जारी केलेल्या आदेशानुसार 05 ऑगस्टपर्यत लागू राहतील. शिवाय कुर्ला (पश्चिम) संत रोहिदास मार्गावर सिताराम भैरु मार्ग ते इगलवाडी लेन या पट्ट्यात 06 ऑक्टोबरपर्यंत जड वाहनांना प्रवेश नसेल. या काळात इतर वाहनांनी समदिनी (2,4,6) रस्त्याच्या पूर्व वाहिनीवर गाड्या पार्क कराव्यात आणि विषमदिनी (1,3,5) रस्त्याच्या पश्चिम वाहिनीवर गाड्या पार्क कराव्यात, असा आदेश जारी करण्यात आला आहे.

Continue reading

डॉक्टरांच्या प्रयत्नाने वाचले सर्पदंश झालेल्या गर्भवतीचे प्राण

नाशिक योथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महाराष्ट्र वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेच्या डॉक्टरांनी सर्पदंश झालेल्या गर्भवती महिलेला आणि तिच्या गर्भातील बाळाला अथक प्रयत्नांनी नुकतेच वाचविले. इगतपुरीतील एका 30 वर्षीय गर्भवती महिलेला सर्पदंश झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले...

भाड्यापोटी विकासकांची म्हाडाकडे १३५ कोटींची थकबाकी!

मुंबईत भाड्यापोटी विकासकांडून म्हाडाला १३५ कोटी रुपयांहून अधिक थकबाकी येणे असतानाच म्हाडाने संक्रमण शिबिरात राहणाऱ्या सदनिकाधारकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या भाड्यात प्रचंड वाढ करण्याचे ठरविले असल्यामुळे भाडेकरूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या सेवाशुल्कवाढीस बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेने तीव्र विरोध करीत आंदोलनाचा ईशारा...

व्हिजन डॉक्युमेंटच्या नावावर होणार मंत्र्यांचे परदेश दौरे! मच्छिमार बोंबलणार!!

राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे व्हिजन डॉक्युमेंट 2047 तयार करत असताना त्यामध्ये वातावरण बदलामुळे मत्स्यव्यवसायावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय यांचा समावेश करावा असे मत्स्यव्यवसाय विभागाने ठरविले आहे. मात्र वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मच्छीमार प्रस्तावित व्हिजन डॉक्युमेंटबाबत साशंक आहेत. मुख्य म्हणजे व्हिजन डॉक्युमेंट तयार...
Skip to content