Homeबॅक पेजएलआयसी-आयडियल चषक बुद्धिबळ...

एलआयसी-आयडियल चषक बुद्धिबळ स्पर्धा उद्यापासून

बालदिनानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक १४ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा उद्या, १५ नोव्हेंबरला आणि सर्वांसाठी खुली बुद्धिबळ स्पर्धा १६ नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या परळ येथील आरएमएमएस वातानुकूलीत सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी एकूण १२० पुरस्कार असून खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी एकूण २५ रोख पुरस्कारांसह प्रथम पुरस्कार रोख रुपये पाच हजारसह आकर्षक एलआयसी-आयडियल चषक आहे. खुल्या स्पर्धेतसुद्धा १३ वर्षांखालील विविध वयोगटासाठी विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत.

मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना व राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने ही स्पर्धा येत्या शनिवारी ७/८/१०/११/१३/१४ वर्षांखालील मुला-मुलींच्या ६ वयोगटात स्विस लीग पध्दतीच्या किमान ४ साखळी फेऱ्यांमध्ये तर खुल्या गटाची बुद्धिबळ स्पर्धा येत्या रविवारी स्विस लीग पद्धतीच्या किमान ७ साखळी फेऱ्यांमध्ये रंगणार आहे. प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे स्पर्धकांना बुद्धिबळ पट व घड्याळ दिले जाणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी शिवछत्रपती पुरस्कारविजेते संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्याकडे व्हॉट्सअॅपवर १२ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा.   

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content