Homeकल्चर +दिल्लीतल्या 'ग्रंथालय महोत्सव'चे...

दिल्लीतल्या ‘ग्रंथालय महोत्सव’चे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार उद्घाटन!

नवी दिल्लीतील प्रगती मैदानामधील हॉल क्रमांक 5 येथे येत्या 5 ते 6 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित दोन दिवसीय ‘ग्रंथालय महोत्सव 2023’ चे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड या कार्यक्रमाच्या सांगता समारंभाला उपस्थित राहतील. भारतातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन यावर संवाद सुरू करण्यासाठी या महोत्सवात जगभरातील प्रतिष्ठित ग्रंथालयांची ओळख करून दिली जाणार आहे.

कायदा आणि न्याय मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि सांस्कृतिक व संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्ली येथे “ग्रंथालय महोत्सव”च्या वेळापत्रकाचे अनावरण केले. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहसचिव मुग्धा सिन्हा यावेळी उपस्थित होते. पत्रकारांना संबोधित करताना अर्जुन राम मेघवाल म्हणाले, ग्रंथालय महोत्सव 2023 हा ज्ञान आणि कल्पनेचा उत्सव आहे. ग्रंथालये हस्तलिखितांचे जतन करतात तसेच इतिहास आणि अमर्याद भविष्यातील दरी सांधतात.

आपल्या डिजिटल लायब्ररी उपक्रमाने अडथळे दूर केले आहेत, सर्व नागरिकांना ज्ञान मिळवण्यास सक्षम बनवले आहे. चला उत्साहाने हा उत्सव साजरा करूया, ग्रंथालयांची परिवर्तनात्मक शक्ती आणि एक राष्ट्र, एक डिजिटल लायब्ररी देणार्‍या अमर्याद संधींचा अंगीकार करूया. ग्रंथालयांच्या विकासाला आमचे प्राधान्य असेल कारण ग्रंथालये हा विकासाप्रति मानवकेंद्री दृष्टिकोनाचा अत्यावश्यक भाग आहे असे ते पुढे म्हणाले. प्रत्यक्ष स्वरूपातील ग्रंथालयांनी आपल्या देशात अभिमानाचे स्थान मिळवले आहे आणि आम्हाला लोकांमध्ये वाचन संस्कृती पुनरुज्जीवित करायची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content