Homeकल्चर +प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट...

प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘खिसा’ सर्वोत्कृष्ट!

‘प्रबोधन गोरेगाव’ संस्थेतर्फे आयोजित प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘खिसा’, या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला आहे. याच लघुपटासाठी राज मोरे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर वेदांत क्षीरसागर सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरला आहे.

मदन काळे दिग्दर्शित ‘लगाम’ या लघुपटाला दुसऱ्या क्रमांकाचे तर विराज झुंजारराव दिग्दर्शित ‘साईड मिरर’ला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, अशोक राणे, दिग्दर्शक निखील महाजन, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितिन शिंदे आदी उपस्थित होते.

सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन गोरेगावच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने हा पहिला प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर येथे शुक्रवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

यावेळी प्रवीण खाडे दिग्दर्शित ‘ताजमहाल’ हा सामाजिक महाराष्ट्र या विषयावरील सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. तर ‘वन्स ही डिड अटीनएज पेंटिंग’ या लघुपटासाठी दीक्षा सोनावणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. या महोत्सवात ७७ मराठी लघुपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यामधून १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. यातून सर्वोत्कृष्ट लघुपटाची निवड करण्यात आली आहे. यावेळी इफ्फी महोत्सवात जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार पटकावणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष गौरव करण्यात आला.

आम्ही यापुढेही प्रत्येकवर्षी हा महोत्सव असाच सुरू ठेवणार असून कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने सर्व पुरस्कार वितरीत होतील, अशी ग्वाही सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.

या फेस्टिवलची रचना अत्यंत वेगळी आणि अभ्यासपूर्ण अशी असून आपल्या मराठी कलावंतांनी निर्माण केलेल्या कलाकृती जगभरात नावाजल्या जाव्यात या उद्देशाने ‘कान्स’, ‘ओबरहौसेन’(जर्मनी), कार्लोवी वेरी (झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी पाच लघुपटांची निवड करण्यात आली. यासाठीचा सर्व खर्च व प्रक्रिया “प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा”च्या वतीने केला जाणार आहे. या महोत्सवाचे परीक्षण मोनालिसा मुखर्जी, मंदार कमलापूरकर, समीक्षक गणेश मतकरी, मनोज कदम व विजय कलमकर यांनी केले.

कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच कलावंत तंत्रज्ञांच्या उपस्थित पहिल्या प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार मिळविणाऱ्या ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटातील प्रमुख अभिनेते जितेंद्र जोशी यांचा विशेष सन्मान होणार होता. मात्र ते कोरोनाग्रस्त असल्याने त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांशी संवाद साधला.

महोत्सवातील पुरस्कार विजेते लघुपट

‘खिसा’ सर्वोत्कृष्ट लघुपट – प्रथम पुरस्कार

रु. ७५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘लगाम’ सर्वोत्कृष्ट लघुपट – द्वितीय पुरस्कार

रु. ५०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘साईड मिरर’ सर्वोत्कृष्ट लघुपट – तृतीय पुरस्कार

रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘ताजमहाल’ सर्वोत्कृष्ट लघुपट सामाजिक लघुपट

(रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

कान्स, ओबरहौसेन जर्मनी, कार्लोवी वेरी (झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी निवड झालेले लघुपट

१. अर्जुन / दिग्दर्शक: शिवराज वाईचळ

२. बटर चिकन / दिग्दर्शक: मयुरेश वेंगुर्लेकर

३. साईड मिरर / दिग्दर्शक: विराज झुंजारराव

४. लगाम / दिग्दर्शक: मदन काळे

५. ताजमहाल / दिग्दर्शक: प्रविण खाडे

वैयक्तिक पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेता – हरीश बारस्कर – (ताजमहाल)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री दीक्षा सोनावणे – (वन्स ही डिड अ टीनएज पेंटिंग)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार – वेदांत क्षीरसागर – (खिसा)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राज मोरे – (खिसा)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट पटकथालेखक – कैलास वाघमारे – (खिसा)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार – किरण जाधव – (लगाम)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट संकलक मयुरेश वेंगुर्लेकर  – (बटर चिकन)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट ध्वनि – अनमोल भावे – (अर्जुन)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content