Homeडेली पल्सदिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा रेल्वे...

दिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा रेल्वे ट्रॅक सुरक्षित करणार ‘कवच’!

रेल्वेगाड्यांची समोरासमोर होणारी टक्कर टळण्यासाठी उपयोगी ठरणारी कवच प्रणाली आता दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा  रेल्वेमार्गाच्या अंदाजे 3000 किमी मार्गावर बसविण्यात येणार आहे. याकरीता नुकत्याच निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत आणि या मार्गांवर काम सुरू झाले आहे.

कवच ही स्वदेशी विकसित केलेली ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे. कवच ही एक उच्च तंत्रज्ञानाने युक्त अशी एक प्रणाली आहे, ज्याला सर्वोच्च पातळीचे सुरक्षा प्रमाणपत्र आवश्यक आहे. कवच विशिष्ट वेग मर्यादेत रेल्वे चालवण्यासाठी लोको पायलटला मदत करते आणि खराब हवामानात रेल्वेला सुरक्षितपणे धावण्यास मदत करते.

कवच आतापर्यंत 1465 किमी मार्गावर आणि 121 लोकोमोटिव्ह दक्षिण मध्य रेल्वेवर (इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट रेकसह) तैनात केले गेले आहे. भारतीय रेल्वे यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) आणि आणखी 6000 किलोमीटर मार्गासाठी साठी तपशीलवार अंदाज तयार करत आहे.

कवचच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत 351.91 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कवचच्या स्टेशन उपकरणासह रेल्वे रूळसाठीच्या तरतुदीची किंमत अंदाजे 50 लाख रुपये प्रति किलोमीटर आहे. गाडीवर कवच उपकरण बसवण्यासाठी अंदाजे 70 लाख रुपये प्रति लोको खर्च आहे.

सध्या तीन भारतीय ओईएम कंपन्या कवचसाठी मंजूर केल्या आहेत. कवचची क्षमता आणि त्याची अंमलबजावणी वाढविण्यासाठी आणखी वेंडर्सचा शोध घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Ashwini Vaishnaw, India’s minister of railways, at the Viva Technology Conference in Paris, France, on Wednesday, June 15, 2022. The conference, also known as VivaTech, runs though to June 18. Photographer: Nathan Laine/Bloomberg via Getty Images

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content