Homeपब्लिक फिगरकतरिना कैफ बनली...

कतरिना कैफ बनली ‘रॅडो’ची ग्लोबल ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर!

रॅडो या कालातीत डिझाइन्‍स निर्मितीकरिता नाविन्‍यपूर्ण साहित्‍याचा उपयोग करण्‍यासाठी ओळखल्‍या जाणाऱ्या प्रतिष्ठित स्विस वॉचमेकर कंपनीने त्‍यांची ग्‍लोबल ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून बॉलिवुड सुपरस्‍टार क‍तरिना कैफ यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

कतरिना कैफ यांची मोहक सुंदरता आणि आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील ख्‍याती त्‍यांना रॅडोची अचूकता, नाविन्‍यता व कलाकृतीप्रती अविरत कटिबद्धता सादर करण्‍यासाठी परिपूर्ण निवड बनवतात. वैविध्‍यपूर्ण टॅलेंट व करिष्‍मासाठी ओळखल्‍या जाणाऱ्या कतरिना कैफ यांच्‍यामध्‍ये रॅडोकरिता लोकप्रिय असलेली मूल्‍ये सामावलेली आहेत.

रॅडोचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अॅड्रियन बोशार्ड म्‍हणाले, आम्‍हाला रॅडो कुटुंबामध्‍ये कतरिना कैफ यांचे स्‍वागत करताना आनंद होत आहे. त्‍यांची मोहक सुंदरता व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील प्रसिद्धी रॅडोच्‍या मुलभूत तत्त्वांशी संलग्‍न आहेत. आम्‍ही सहयोगाने लक्‍झरीला नव्‍या उंचीवर नेण्‍याच्‍या या प्रवासाप्रती उत्‍सुक आहोत.

कतरिना कैफ या सहयोगाबाबत म्‍हणाल्‍या की, मला वॉचमेकिंगमधील सर्वोत्तमतेसाठी ओळखला जाणारा ब्रॅण्‍ड रॅडोसोबत सहयोग करण्‍याचा सन्‍मान वाटण्‍यासोबत आनंद होत आहे. रॅडो वॉचेसनी त्‍यांची नाविन्‍यपूर्ण डिझाइन्‍स व दर्जाप्रती कटिबद्धतेमुळे माझे लक्ष वेधून घेतले आहे. मी या प्रतिष्ठित स्विस ब्रॅण्‍डचे जागतिक व्‍यासपीठावर प्रतिनिधीत्‍व करण्‍यास उत्‍सुक आहे.

रॅडोसाठी ग्‍लोबल ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर असलेल्‍या कतरिना कैफ ब्रॅण्‍डच्या नवीन मोहिमांमध्‍ये दिसल्‍या आहेत. रॅडोसोबतच्‍या त्‍यांच्‍या पहिल्‍या मोहिमेमधून अपवादात्‍मक टाइमपीसेस निर्माण करण्‍याप्रती ब्रॅण्‍डची कटिबद्धता दिसून येते, ज्‍यामध्‍ये दीर्घकालीन स्‍टाइलसह कालातीत साहित्‍याचा वापर करण्‍यात आला आहे.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content